कोरोनाचा हाहाकार! कोरोनामुळे पतीच्या मृत्युनंतर पत्नीने नवव्या मजल्यावरुन उडी मारत जीवन यात्रा संपवली

देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर घातला आहे. त्यामुळे रोज लाखोंच्या संख्येने रुग्ण सापडत आहे. अशात काही रुग्णांचा मृत्यु सुद्धा होत आहे.त्यामुळे कोरोना काळात अनेक कुटुंब उध्वस्त होत आहे.

अशातच कोरोनाच्या या संकटात अनेक धक्कादायक घटना बघायला मिळत आहे. आता कोरोनामुळे पतीचे निधन झाल्याने पत्नीने थेट नवव्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मध्यप्रदेशमध्ये ही घटना घडली आहे.

मध्य प्रदेशच्या इंदोर शहरात ही घटना घडली आहे. आपल्या पतीने कोरोनामुळे निधन झाल्याचा धक्का सहन करु न शकलेल्या एका महिलेने इमारतीच्या नवव्या मजल्यावरुन उडी मारत आत्महत्या केली आहे.

एका महिलेने इमारतीच्या नवव्या मजल्यावरुन उडी मारली होती. त्यानंतर तिचा जागीच मृत्यु झाला आहे. कोरोनामुळे पतीचे निधन झाल्यामुळे तिने टोकाचे पाऊल उचलले असे स्थानिक पोलिसांनी म्हटले आहे.

दरम्यान, गुजरातच्या द्वारका शहरात पण अशीच एक घटना घडली होती. या शहरातील रहिवासी जयेशभाई जैन यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांचे एक नाश्त्याचे दुकान होते, त्याच्यावरच कुटुंबाचा उदर्निवाह चालायचा. पण कोरोनाचा संसर्ग झाला आणि त्यातच त्यांचा मृत्यु झाला होता.

जयेशभाई यांच्यावर अंत्यसंस्कार केल्यानंतर त्यांची पत्नी आणि दोन मुले यांनीही टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली होती. अंत्यसंस्कार करुन आल्यानंतर तिघांनीही विष पिऊन आत्महत्या केली होती. कुटुंब प्रमुखाचे कोरोनामुळे निधन झाल्याने त्यांना मानसिक धक्का बसला होता, असे पोलिसांनी म्हटले होते.

महत्वाच्या बातम्या-

१५ दिवस रूग्ण जिवंत असल्याचं सांगत कुटुंबीयांना फसवलं, नंतर समोर आलं धक्कादायक कारण
भारतातील चहाने या विदेशी महिलेला बनवले करोडपती, वाचा एक रोमांचक कहाणी
परेदशातून ७ लाख रुपये देऊन कॉलगर्ल बोलावणे पडले महागात; घडली धक्कादायक घटना

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.