जगातील दिग्गज फास्ट बॉलर आणि यॉर्कर किंग म्हणून लसिथ मलिंगा प्रसिद्ध आहे. लसिथ मलिंगावर श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने मोठी जबाबदारी दिली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या मर्यादित ओव्हरच्या सीरिजसाठी मलिंगाला श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने स्ट्रॅटजी कोच बनवले आहे.
लसिथ मलिंगाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर प्रशिक्षणाला देखील सुरूवात केली होती. नुकत्याच पार पडलेल्या आयपीएलमध्ये तो राजस्थान रॉयल्सचा बॉलिंग कोच म्हणून काम करत होता. मलिंगाच्या प्रशिक्षणाचा राजस्थान संघाला चांगलाच फायदा झाला होता.
२००८ नंतर पहिल्यांदाच राजस्थानची टीम आयपीएलच्या फायनलमध्ये पोहोचली होती. फायनलमध्ये गुजरात टायटन्सकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर आता मलिंगा श्रीलंकेच्या बॉलरना मदत करणार आहे. आयपीएलमध्ये मलिंगा मुंबई इंडियन्सचा भाग होता. मुंबई इंडियन्सला चॅम्पियन बनवण्यात मलिंगाचा मोठा वाटा होता.
श्रीलंकन बॉलिंगला गती देणं तसंच रणनिती ठरवणं आणि बॉलरचं तंत्र आणखी मजबूत करणं, ही जबाबदारी श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने मलिंगावर सोपवली आहे. मलिंगा ही जबाबदारी ७ जूनपासून सुरू होणाऱ्या श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया सीरिजपासून स्वीकारणार आहे. कोलंबो येथे श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ३ टी-२० आणि ५ एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे.
श्रीलंका क्रिकेट बोर्डाने सांगितले आहे की, “मलिंगाने यापूर्वी देखील भूमिका बजावलेली आहे. फेब्रुवारीमध्ये झालेल्या टी-२० मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाच्या श्रीलंका दौऱ्यातही तो याच भूमिकेत होता. त्यानंतर श्रीलंकेला ५ सामन्यांच्या मालिकेत १-४ असा पराभव स्वीकारावा लागला होता. श्रीलंकेच्या गोलंदाजांनी ५ सामन्यांच्या मालिकेत चांगली कामगिरी केली होती.
२०२१ टी-२० विश्वचषक विजेता ऑस्ट्रेलिया संघ सध्या जबरदस्त कामगिरी करत आहे. नुकत्याच पार पडवलेल्या आयपीएलमधेही खेळाडूंनी चांगले प्रदर्शन केले आहे. त्यामुळे मायदेशात खेळूनही यजमान श्रीलंकेसमोर कांगारू संघाचे मोठे आव्हान असणार आहे.
महत्वाच्या बातम्या:-
कश्मीरमधील परिस्थीती नियंत्रणाबाहेर; १८०० पंडीत, ३ हजार सरकारी कर्मचाऱ्यांनी कश्मीर सोडले
धनंजय महाडिक यांची माघार? महाविकास आघाडीचे शिष्टमंडळ फडणवीसांच्या भेटीला
कॉंग्रेसमधील सध्याची परिस्थिती चिंताजनक, राहूल गांधी चार वर्षापासून भेटले नाहीत – पृथ्वीराज चव्हाण