पहिल्या चित्रपटामध्ये असे काय झाले की, सलमान खानने घेतला एवढा मोठा निर्णय

फिल्म इंडस्ट्रीमध्ये करिअर करण्यासाठी सध्या अभिनेते अनेक गोष्टी करत असतात. जर कलाकारांनी त्यांच्या चित्रपटांवर मेहनत घेतली नाही. तर त्यांना फिल्म इंडस्ट्रीमध्ये यश मिळवता येत नाही. म्हणून सध्या बॉलीवूडमध्ये काम करणारा प्रत्येक एक कलाकार त्याच्या चित्रपटासाठी खुप जास्त मेहनत घेत असतो.

त्यासोबतच आजकाल बॉलीवूडमध्ये यश मिळवण्यासाठी कलाकार काहीही करायला तयार असतात. अनेकदा ते चित्रपट हिट करण्यासाठी चित्रपटामध्ये किसिंग सीन आणि बोल्ड सीन्स देखील देतात. हे सीन्स सध्या बॉलीवूड चित्रपटांमध्ये खुप सामान्य झाले आहेत.

त्यामुळे बॉलीवूडचे सगळे अभिनेते किसिंग सीन आणि बोल्ड सीन्स अतिशय बिनधास्तपणे देतात. सुपरस्टार आमिर खानने देखील त्याच्या अनेक चित्रपटांमध्ये किसिंग सीन्स दिले आहेत. एवढेच नाही तर महानायक अमिताभ बच्चन देखील चित्रपटांमध्ये किसिंग सीन दिले आहेत.

पण बॉलीवूडमध्ये असा एक अभिनेता आहे. ज्याने आजपर्यंत कोणत्याही चित्रपटामध्ये किसिंग सीन दिला नाही. या अभिनेत्याचे नाव आहे बॉलीवूडचा भाईजान सलमान खान. सलमान खान गेले ३० वर्ष फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे.

परंतु एवढ्या वर्षांमध्ये आजपर्यंत त्याने कधीच कोणत्याही चित्रपटामध्ये किसिंग दिला नाही. या गोष्टी मागे एक खुप मोठे कारण आहे. ज्यामुळे सलमान खानने त्याच्या पहिल्याच चित्रपटामध्ये ठरवले होते की तो कधीही चित्रपटामध्ये किसिंग सीन देणार नाही.

हा किस्सा आहे ‘मैने प्यार किया’ चित्रपटाच्या शुटिंगचा. हा सलमान खान पहिला हिट चित्रपट होता. या चित्रपटाने त्याचे आयुष्य बदलले होते. या चित्रपटामध्ये सलमानसोबत भाग्यश्री काम करत होती.

या चित्रपटामध्ये एक किसिंग सीन होता. त्यामुळे दिग्दर्शकाने हा सीन शुट करायची तयारी सुरू केली. सलमान देखील या सीनसाठी तयारी होता. त्याला या सिनची काहीही अडचण नव्हती. पण चित्रपटाची अभिनेत्री भाग्यश्रीला मात्र या सीनची अडचण होती.

म्हणून तिने हा शुट करायला नकार दिला. चित्रपटाच्या निर्मात्यांनी दिला समजून सांगण्याचा प्रयत्न केला. पण तरीही तयार झाली नाही. त्यानंतर सलमानने तिला कारण विचारले होते. त्यावेळी ती म्हणाली होती की, ‘माझं हिमालयसोबत अफेअर आहे. आम्ही एकमेकांवर खुप प्रेम करतो. पण चित्रपटातील किसींग सीनमूळे आमच्या नात्यात अडचणी निर्माण होऊ शकतात’.

ही गोष्ट ऐकल्यानंतर सलमानला समजले की, अभिनेत्री असली तरी ती एक मुलगी असते. तिच्यावर अनेक जबाबदाऱ्या असतात. म्हणून चित्रपटामध्ये असे किसींग असायला नको. त्या दिवशी सलमान खानने ठरवले की तो कधीच चित्रपटांमध्ये किसिंग सीन देणार नाही.

म्हणून एवढ्या वर्षांमध्ये देखील सलमान खानने कोणत्याही चित्रपटामध्ये किसिंग सीन दिले नाहीत. तो नेहमीच किसींग सीन आणि बोल्ड सीन्सला नकार देतो. या गोष्टीची माहीती स्वतः सलमानने एका मुलाखतीमध्ये दिली होती.

महत्त्वाच्या बातम्या –

७० च्या दशकातील टॉपच्या अभिनेत्रीची आज झाली आहे ‘अशी’ अवस्थता; पहा फोटो

लग्नाला होकार देण्या अगोदर ट्विंकलने अक्षयसमोर ठेवली होती ‘ही’ अट

त्या दिवशी जुही चावलाची माफी मागून रडत होते अभिनेते फिरोज खान

बालकलाकार राजू मास्टरला अचानक बॉलीवूडमध्ये काम मिळणे बंद का झाले?

पुजा भट्ट आणि सोहेल खानच्या अफेअरमूळे दोन्ही कुटुंबात वाद झाले

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.