सध्या अनेक चित्रपटसृष्टीतील अनेक अभिनेते व अभिनेत्री विवाहबंधनात अडकत आहेत. आता या यादीत आणखी एका नावाची भर पडली आहे. नुकताच भोजपुरी अभिनेत्री निधी झा आणि अभिनेता(Actor) यश कुमार(Yash Kumar) यांचा विवाह सोहळा पार पडला आहे. अभिनेत्री निधी झा आणि अभिनेता यश कुमारने आपल्या लग्नाचे फोटो इंस्टाग्रामच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.(After divorcing his wife, actor Yash got married to his girlfriend)
यावर चाहत्यांकडून निधी झा आणि यशवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अभिनेता यश कुमारचे हे दुसरे लग्न आहे. भोजपुरी अभिनेत्री अंजना सिंहसोबत यशने पहिले लग्न केले होते. यश आणि अंजना यांना एक मुलगी देखील आहे. भोजपुरी अभिनेत्री अंजना सिंहसोबत घटस्फोट घेतल्यानंतर अभिनेता यश जवळपास तीन वर्षांपासून निधी झा हीला डेट करत होता.
११ फेब्रुवारी २०२२ रोजी अभिनेत्री निधी झा आणि अभिनेता यश कुमार यांचा साखरपुडा झाला होता. त्यांच्या साखरपुडा सोहळ्याचा व्हिडिओ देखील समोर आला होता. यानंतर अभिनेत्री निधी झा हीने ४ मे २०२२ रोजी तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अभिनेत्री निधी झा पती यशासोबत दिसत आहे.
या फोटोमध्ये अभिनेत्री निधी झा हीने पिवळ्या रंगाची साडी घातली आहे. तसेच फोटोमध्ये अभिनेत्री निधी झा हीच्या गळ्यात मंगळसूत्र दिसत आहे. त्याचवेळी अभिनेता यश कुमारने पांढरा कुर्ता आणि पायजमा घातला आहे. तसेच गळ्याभोवती पिवळ्या रंगाचा दुपट्टा घेतला आहे. मी आणि माझा नवरा नवीन आयुष्य सुरू करत आहोत, असे अभिनेत्री निधीने या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे.
अभिनेता यश कुमारने देखील लग्नानंतरचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये अभिनेत्री निधी झा लाल रंगाच्या साडीमध्ये दिसत आहे. तसेच अभिनेता यश कुमारने हिरव्या रंगाचा शर्ट घातला आहे. पत्नी निधी मिश्रासोबत लग्नानंतरचा पहिला फोटो, असे अभिनेता यश कुमारने फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे.
याशिवाय अभिनेता यश कुमारच्या साखरपुडा सोहळ्याचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेता यश कुमार काळ्या रंगाच्या सूटमध्ये दिसत आहे. तर अभिनेत्री निधी झा ही गुलाबी रंगाच्या गाऊनमध्ये दिसत आहे. या व्हिडिओमध्ये दोघेही खूप सुंदर दिसत आहेत. हा व्हिडिओ अभिनेत्री निधीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. “हे अधिकृत आहे. आमचा साखरपुडा झाला आहे”, असे अभिनेत्री निधीने कॅप्शनमध्ये लिहिले आहे.
महत्वाच्या बातम्या :-
प्रतीक्षा संपली! आजच्या सामन्यात अर्जुन तेंडुलकरला संधी मिळणार; मुंबईच्या प्रशिक्षकांनी दिले संकेत
आंतरधर्मीय लग्नामुळे हिंदू तरुणाची मुस्लीम तरुणीच्या कुटुंबीयांकडून भररस्त्यात हत्या; उडाली खळबळ
या शुक्रवारी रिलीज होणार ‘हे’ सुपरहिट चित्रपट, थ्रिल, रोमान्स आणि देशभक्तीचा लागणार तडका