आयुष्याची नव्याने सुरुवात करणार मंदिरा बेदी; पतीच्या निधनानंतर पोस्ट शेअर करत म्हणाली…

मागील महिन्यात अभिनेत्री मंदिरा बेदीच्या पतीचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. तिच्यावर आणि परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला. पती राज कौशलच्या निधनानंतर मंदिरा तिचे विस्कळीत झालेले जीवन पुन्हा ट्रकवर आणण्याचा प्रयत्न करत आहे. इतक्यातच तिने सोशल मिडीयावर पोस्ट शेअर केल्याने तिच्या नवीन सुरुवातीकडे लक्ष वेधले गेले आहे.

सोमवारी मंदिराने एक पॉझिटिव्ह पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने लिहिले आहे की, ‘ i am worthy, i am capable, i am loved, i am strong…’  या पोस्ट सोबत मंदिराने लिहिले आहे की, आता नवीन सुरुवात करण्याची वेळ आली आहे. या पोस्ट वर अनेक कलाकारांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

अभिनेता अर्जुन बिजलानीने मंदिराच्या या पोस्टवर लिहिले आहे की, ‘एकदम बरोबर’. तसेच फराह खानने प्रतिक्रिया दिली आहे की, ‘तुला खूप शक्ती मिळो’.  कलाकारांच्या या प्रतिक्रियेतून आपल्या लक्षात येते की, सर्वांनाच वाटत आहे,  मंदिराने या दुखातून लवकरात लवकर बाहेर पडावे.

याआधी मंदिराने आपला एक कौटुंबिक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये तिची दोन मुले वीर आणि तारा होते. याशिवाय फोटोमध्ये तिचे पेरेंट्स देखील होते. मंदिराने लिहिले होते की, ‘माझ्या कुटुंबासाठी आणि प्रत्येकाच्या प्रेमासाठी, समर्थन आणि दयाळूपणासाठी मी सर्वांचे आभार व्यक्त करते.

राज कौशलच्या निधनानंतर मंदिराने एकही पोस्ट शेअर केली नव्हती. आता शेअर केलेल्या पोस्टमध्ये तिने तिच्या पतीबरोबर काढलेल्या फोटोंचा समावेश केला आहे. एका पोस्टमध्ये मंदिराने पती राजसोबतचा एक फोटो शेअर करत लिहिले की, ‘२५ वर्ष एकमेकांना ओळखलं आहे, लग्नाची २३ वर्षे प्रत्येक संघर्ष आणि चढ-उतार यामध्ये एकमेकांना साथ दिली आहे.

१४ फेब्रुवारी १९९९ रोजी मंदिरा आणि राज यांचे लग्न झाले होते. दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मागील वर्षी राज आणि मंदिराने मुलगी तारा हिला दत्तक घेतले. त्यांची पहिली भेट १९९६ साली मुकुल आनंदच्या घरी झाली. मंदिरा मुकुल आनंद यांच्याकडे ऑडिशनला गेली होती. राज मुकुल आनंदकडे सहाय्यक म्हणून काम करत होते. तिथूनच त्यांच्या प्रेमाला सुरुवात झाली.

राज कौशल यांचे वयाच्या ४९ व्या वर्षी, ३० जून रोजी अचानक निधन झाले. राजने एक अभिनेता म्हणून करीयरची सुरुवात केली. तसेच त्यांनी प्यार मे कभी कभी, शादी का लड्डू, ॲथनी कौन है यांसारख्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

हे ही वाचा-

पूरग्रस्त भागात ३ दिवसात ११३७ किलोमीटर फिरलो, आता राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार

मुली काही करु शकत नाही म्हणणाऱ्या लोकांना लव्हलिनचे सडेतोड उत्तर; टोकियोत भारताला मिळवून दिले पदक

देशातील बँकांमध्ये, विमा कंपन्यांमध्ये ५० हजार कोटी पडून, लोक पैसे जमा करून विसरले

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.