मगरीचे पोट कापल्यानंतर शिकारी झाला सुन्न; ६००० वर्ष जुना ‘खजिना’ मिळाला…

अमेरिकेतील एका शिकाऱ्याने १३ फूट लांब मगरीची शिकार केली. जेव्हा पाण्यातील या सर्वात धोकादायक प्राण्याचे पोट कापले गेले, तेव्हा शिकारी आत जे सापडले ते पाहून तो सुन्न झाला.  शिकारी जॉन हॅमिल्टन ही विशाल मगर घेऊन अमेरिकन शिकारी शेन स्मिथकडे कापण्यासाठी घेऊन गेला. जेव्हा दोघांनी ही मगर कापली, तेव्हा त्यांना एक प्राचीन बाण असलेला भाग आणि एक छोट यंत्र सापडले.

शिकारी शेनने अंदाज लावला की मगरीने तिला मारलेला बाण गिळला असेल. AL अहवालानुसार, मिसिसिपी राज्यातील भूवैज्ञानिकांनी अभ्यास केला आणि त्यांना आढळले की या वस्तू ५००० ते ६००० वर्षे जुन्या आहेत आणि बहुधा जमिनीवर पडलेल्या होत्या. शेनच्या प्लांट रेड अँटलर प्रोसेसिंगने फेसबुकवर लिहिले, ‘आम्ही काही मोठ्या मगरांना कापत आहोत हे पाहण्यासाठी की, त्यांच्या पोटात काय आहे.

फेसबुक पोस्टमध्ये त्यांनी असे लिहिले आहे की, ‘आतापर्यंत प्रत्येक मगरीकडून काहीतरी मनोरंजक बाहेर आले आहे. जॉन हॅमिल्टनने आज १३ फूट पाच इंच लांब मगर आणला आहे, जो अतिशय धक्कादायक होता.

इतिहासकारांचे म्हणणे आहे की तुटलेले एरोहेड आणि प्लममेट हे मूळच्या अमेरिकन लोकांनी पुरातन काळात वापरलेल्या मासेमारीची उपकरणे आहेत. मगरीच्या पोटाट माशांची हाडे, पंख, केस आणि दुर्गंधीयुक्त द्रवपदार्थासह काही प्राचीन उपकरणांसह होते.

‘आधी मला वाटले की मी हे फेसबुकवर पोस्ट करणार नाही कारण कोणीही यावर विश्वास ठेवणार नाही,’ शेन मिसिसिपी क्लॅरियन म्हणाला. पण लवकरच त्याने आपला विचार बदलला आणि  ही पोस्ट फेसबुकवर शेअर केली.

त्यावर त्यानेच विनोद केला की, ‘कदाचित मी पृथ्वीवरील एकमेव व्यक्ती असेल ज्याने मगरीच्या पोटातून बाण काढला आहे.’ शेनचा असा विश्वास आहे की मगर पचन करण्यास सक्षम असते कारण काहीही कठीण वस्तू  खाल्ले किव्हा दगड सुद्धा मगर तुकडे करू शकते.

महत्वाच्या बातम्या
मुनमुन दत्तासोबतच्या रिलेशनशिपबाबत टप्पूने सोडले मौन; प्रतिक्रीया ऐकून तुम्हालाही धक्का बसेल
”हा देश आधी इंग्रजांनी आणि नंतर काँग्रेसने लुटला” योगी आदित्यनाथ यांची खरमरीत टीका
क्रिकेट विश्वातून मोठी बातमी! विराट कोहली कर्णधारपदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत.. 
अरब राष्ट्रांप्रमाणेच बलात्काऱ्यांना भर चौकात फाशी देता येईल का? – इम्तियाज जलील

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.