पैसा जाताच पोटच्या पोरीचीही माया आटली! राणू मंडलला वाऱ्यावर सोडून पोरगी फरार

पश्चिम बंगालमधील रानाघाट स्टेशनवरून लता मंगेशकर यांचे ‘प्यार का नगमा’ हे गाणे गाऊन राणू मंडल रातोरात स्टार बनली. हिमेश रेशमियासोबत तीने गाणी रेकॉर्ड केली. रानूने गायलेले ‘तेरी मेरी कहानी’ हे गाणे रिलीज होताच सोशल मीडियावर खळबळ उडाली. त्या गाण्याची सर्वत्र चर्चा झाली आणि त्याची लोकप्रियता गगनाला भिडली.

हिमेश रेशमियाने ब्रेक दिल्याने स्टार बनलेल्या राणूला मिळालेली प्रसिद्धी आणि यश फार काही काळ टिकवता आले नाही. पैसा, प्रसिद्धी सर्वच गोष्टी तिला मिळायला सुरुवात झाली. राहते घर सोडून नवीन घरातही ती राहायला गेली होती. बॉलिवूडमध्ये गाण्याच्या संधी मिळत नसल्या तरीही अनेकदा टीव्ही रिएलिटी शोमध्ये तिला बोलवले जायचे. परंतु हे सर्व फार काळ टिकले नाही.

सोशल मीडियावर राणूच्या वागण्यावर बरीच चर्चा झाली. वास्तविक, स्टार झाल्यानंतर राणू मंडलचा स्वभाव खूप बदलला होता. ती अनेक वेळा चाहत्यांशी आणि माध्यमांशी गैरवर्तन करताना दिसली. एवढेच नाही तर राणूच्या हिमेशसोबतच्या भांडणाच्या बातम्याही समोर आल्या. यामुळे तीला खूप ट्रोलही करण्यात आले होते.

सोशल मीडियावरही लोक तिला गर्विष्ठ म्हणू लागले. या सर्व गोष्टींमुळे तिच्यावर पुन्हा एकदा रस्त्यावर गाण्याची वेळ आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, कोरोना महामारीमुळे तिची आर्थिक परिस्थिती अधिकच बिघडली आहे. राणूला मुंबईत कोणतेही काम मिळत नाही आहे, यामुळे ती खूप अस्वस्थ आहे. यामुळे तिला पूर्वीसारखेच आयुष्य जगावे लागत आहे.

राणू मंडलला जेव्हा प्रसिद्धी मिळाली होती. तेव्हा मुलीनेही राणूला जवळ केले होते. तिच्यासोबतच राहत होती. चांगल्या दिवसांत मुलीनेही तिला साथ दिली. पण जसजशी राणूची आर्थिक स्थिती ढासळू लागली तेव्हापासून मुलीनेही राणूची साथ सोडल्याचे समोर आले आहे.

दिग्दर्शक हृषीकेश मंडल यांच्या म्हणण्यानुसार, राणू मंडल यांच्या जीवनावरील चित्रपट बंगाली भाषेत बनवण्यात येणार होता. परंतु काही कारणास्तव चित्रपट हिंदीत शूट करण्याचा निर्णय घेतला. दिग्दर्शकाने सांगितले की, बऱ्याच कलाकारांना सदर पत्राची भूमिका करण्याबद्दल विचारणा केली होती पण, प्रत्येकाला रानू मंडलचे पात्र साकारणे अपमानास्पद वाटले. शेवटी इशिका डे ने ही भूमिका साकारण्यास अनुमती दर्शवली.

 

महत्वाच्या बातम्या
“पवारांनी काँग्रेसची‌ काळजी करू नये, त्यांना अजून स्वत:च्या पक्षाचा मुख्यमंत्री करता आला नाही”
लाव रे तो व्हिडीओ! वाहतूक पोलीस फेरीवाल्यांकडून पैसे घेतानाचा व्हिडीओ मनसेने केला पोस्ट
महिला कॉन्स्टेबल आणि डीएसपी स्विमिंगपूलमध्ये करत होते अश्लीश चाळे; व्हिडिओ व्हायरल
दिलासादायक बातमी! देशात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता कमी, ICMR च्या माजी प्रमुखांचा दावा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.