कुरेशी भीतीने थरथरत होता, कपाळावर घाम फुटला होता; अभिनंदनला पकडल्यावर पाकड्यांचे झाले होते ‘हे’ हाल

भारतीय वायुसेनेचे ग्रुप कॅप्टन अभिनंदन वर्धमान यांना त्यांच्या शौर्याबद्दल वीर चक्र प्रदान करण्यात आले आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांचा गौरव केला. अभिनंदन यांना हा सन्मान देण्यात आला कारण त्यांनी बालाकोट हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानी F-16 लढाऊ विमान त्यांच्या मिग-21 बायसन फायटर विमानाने पाडले होते.

मात्र, नंतर अभिनंदन यांचे विमान पाकिस्तानच्या हद्दीत कोसळले, त्यानंतर त्यांना पाकिस्तानी लष्कराने ताब्यात घेतले. भारताच्या दबावाखाली पाकिस्तानने सुमारे 60 तासांनंतर अभिनंदनला सोडले होते. तेथून निघाल्यानंतर संपूर्ण देशात आनंदाची लाट उसळली. अभिनंदन यांना पाकिस्तानने 60 तास आपल्याजवळ ठेवले तेव्हा काय घडले ते आम्ही तुम्हाला सांगतो.

खरतर, पाकिस्तानचे पीएमएल-एन खासदार अयाज सादिक यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये संसदेत खुलासा केला होता की, परराष्ट्र मंत्री एसएम कुरेशी यांनी पीपीपी, पीएमएल-एन आणि लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांच्यासह संसदीय नेत्यांच्या बैठकीत अभिनंदनला मुक्त करण्यास सांगितले होते.

त्यावेळी विरोधकांनी अभिनंदनसह सर्व मुद्द्यांवर सरकारला पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले होते. अयाज सादिक यांनी खुलासा केला होता की, परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी या महत्त्वाच्या बैठकीत चर्चा करत होते की, जर पाकिस्तानने अभिनंदननला सोडले नाही, तर भारत रात्री नऊ वाजेपर्यंत पाकिस्तानवर हल्ला करत आहे.

ते म्हणाले होते की, मला चांगले आठवते की एमएम कुरेशी त्या बैठकीत होते ज्यामध्ये पंतप्रधान इम्रान खानने सहभागी होण्यास नकार दिला होता. कुरेशी यांचे पाय थरथरत होते, त्यांना घाम फुटला होता. या बैठकीत परराष्ट्र मंत्री कुरेशी म्हणाले होते की, ‘अल्लाह के वास्ते इसको वापस जाने दो’, कारण रात्री 9 वाजता भारत पाकिस्तानवर हल्ला करेल. तसेच अयाज म्हणाले की, भारत हल्ला करणार नव्हता. सरकारला फक्त गुडघे टेकून अभिनंदन यांना परत पाठवायचे होते, ते त्यांनी केले.

फेब्रुवारी 2019 च्या रात्री, भारताने बालाकोटमधील दहशतवादी तळावर हवाई हल्ला केला.
आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, गेल्या वर्षी 26-27 फेब्रुवारी 2019 च्या रात्री भारताने बालाकोटमधील दहशतवादी तळावर हल्ला केला होता, त्यानंतर पाकिस्तानने भारतात हल्ला करण्यासाठी आपली लढाऊ विमाने पाठवली होती. प्रत्युत्तर म्हणून विंग कमांडर अभिनंदन यांनी मिग-21 विमानाने उड्डाण केले.

विंग कमांडर अभिनंदन यांनी पाकिस्तानी F-16 विमान पाडले. यादरम्यान तो विमानाचा पाठलाग करत सीमा ओलांडून गेला होता आणि पकडला गेला. चौकशीदरम्यान, पाकिस्तानी लष्कराने त्याला चहा प्यायला दिला होता आणि त्याचा व्हिडिओ शेअर करून अभिनंदनला कसे वागवले जात आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला होता. भारताच्या कठोर भूमिकेमुळे पाकिस्तानला अभिनंदन वर्धमान यांना भारतात सुखरूप पाठवण्यास भाग पाडले होते. 1 मार्च रोजी अटारी-वाघा सीमेवरून तो भारतात परतला होता.

हे ही वाचा-
रोहित शर्माने एका झटक्यात मोडले विराट कोहलीचे हे रेकॉर्ड, बनला जगातील एक नंबरचा फलंदाज
शेवटपर्यंत सरकारला दिली नाही जमीन, हायवेच्या मधोमध आहे या महिलेचे घर, वाचा अनोखा किस्सा
..त्यामुळे बॉक्सिंग रिंगमध्ये उतरण्यापुर्वी माईक टायसन करायचा हार्डकोर सेक्स, ड्रायव्हरचा मोठा खुलासा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.