ड्रग्ज प्रकरणी नाव आल्यानंतर ‘या’ अभिनेत्रीने घेतली थेट हायकोर्टात धाव

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणामध्ये दिवसेंदिवस नव्या गोष्टींचा उलघडा होतो आहे. सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीला ड्रक्स प्रकरणी अटक झाल्यानंतर चौकशीमध्ये अनेक नवीन नावे उघडकीस आली आहेत. यामध्ये अभिनेत्री रकुलप्रीत सिंग हिचेही नाव समोर आले आहे.

या प्रकरणात आपले नाव समोर आल्यावरती मीडिया ट्रायलला रकुल वैतागली आहे. तिने आता दिल्ली उच्च न्यायालयाकडे धाव घेतली आहे. आपल्यावरती होणारी मीडिया ट्रायल थांबवावी अशी मागणी तिने न्यायालयाकडे केली आहे.

मीडियामध्ये दाखवल्या जाणाऱ्या गोष्टींमुळे आपली प्रतिमा खराब होत आहे असे तिने म्हटले. आणि यामुळे मीडिया ट्रायल थांबवली जावी अशी मागणी तिने माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडे केली आहे.

सुशांत प्रकरणी चौकशीसाठी सीबीआय टीम दिल्लीला रवाना झाली असून पुढील तपास सुरू आहे.
गुरुवारी एम्सच्या डॉक्टरांना सीबीआय टीम भेटणार असून एम्सची टीम आपला अंतिम अहवाल देण्याची शक्यता आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.