Share

Prathamesh Parab : अखेर दगडूला रियल लाईफमधील प्राजू मिळालीच; पहा जोडीचे खास फोटो

Prathamesh Parab

Prathamesh Parab : सुप्रसिद्ध मराठी चित्रपट ‘टाईमपासने’ मराठी चित्रपटसृष्टी गाजवली होती. टाईमपासमधील ‘दगडू’ हा सर्वांच्याच परिचयाचा आहे. सध्या आता तो चर्चेत आला आहे. दगडूला त्याच्या खऱ्या आयुष्यातील प्राजु मिळाली असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

टाईमपास चित्रपटातील दगडूची भूमिका साकारणारा अभिनेता प्रथमेश परब याने दिवाळीनिमित्त खास फोटोशूट केले आहे. या फोटोमध्ये त्याच्यासोबत एक मुलगीही दिसत आहे. ही मुलगी दगडूची खऱ्या आयुष्यातील प्राजु असल्याचे बोलले जात आहे.

त्याच्या या फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. प्रथमेश परबने सोशल मीडियावर क्षितिजा घोसाळकरसोबत काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो सध्या प्रचंड व्हायरल होत आहेत. या फोटोवरून ते दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याचे बोलले जात आहे.

या फोटोवर चाहत्यांनी कमेंट्सही केल्या आहेत. ‘दादूस आमची वहिनी काय?’ असा प्रश्न त्यांनी प्रथमेश परबला विचारला आहे. मात्र, यावर प्रथमेशने काहीही उत्तर दिलेले नाही. तसेच त्या दोघांनी त्यांच्या नात्याबद्दल अजून खुलासाही केला नाही.

याआधीही प्रथमेशने त्या दोघांचे काही फोटो शेअर केले होते. त्यामुळे क्षितिजा ही त्याची खऱ्या आयुष्यातील प्राजु आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. “निमित्त जरी दिवाळीचं असलं तरीदेखील नात्यांचं साजरं होणं महत्वाचं!” असे त्याने या पोस्टमध्ये लिहिले आहे.

प्रथमेश परबने आजपर्यंत अनेक चित्रपटांत काम केले आहेत. बालक पालक, टाईमपास, उर्फी, टकाटक अशा अनेक चित्रपटांमधून तो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यापैकी टाईमपास या चित्रपटातील दगडूच्या भूमिकेने तो प्रचंड गाजला. या चित्रपटाचे आतापर्यंत तीन भाग आलेले आहेत.

महत्वाच्या बातम्या  
bjp : टाईमपास’फेम दगडू गेला भाजपच्या मुरजी पटेलांच्या रॅलीत, म्हणाला, “माझ्या घरात गटाराचं पाणी… 
Timepass 3: टाईमपास ३ चा बाॅक्स ऑफीसवर जोरदार धडाका; ३ दिवसांत केली तब्बल ‘एवढ्या’ कोटींची कमाई 
आईबाबा आणि साईबाबाची शप्पथ; टाईमपास ३ चा टीझर रिलीज, हृताचा राऊडी लूक आला समोर 
आपल्या दोस्ताला जो नडेल त्याचा आपण; टाईमपास ३ मध्ये राऊडी लूकमध्ये दिसणार हृता, पहा टीझर

ताज्या बातम्या इतर मनोरंजन

Join WhatsApp

Join Now