प्रेम खूप निर्मळ असतं. पण काही वेळा अनेकांचा प्रेमात विश्वासघात होतो. असाच काहीसा प्रकार एका प्रियकरासोबत झाला आहे. प्रेमात विश्वासघात झाल्यानंतर प्रियकराने प्रेयसीला एक ब्रेकअप लेटर लिहिले आहे. हे ब्रेकअप लेटर सध्या सोशल मीडियावर(Social Media) तुफान व्हायरल होत आहे. या ब्रेकअप लेटरची सध्या जोरदार चर्चा होत आहे.(After a breakup with his girlfriend, his boyfriend wrote an letter)
हे ब्रेकअप लेटर वाचल्यास तुम्हाला हसू आवरणार नाही. तुझा मोठा भाऊ समजून माझ्या चुका माफ कर, असे प्रियकराने ब्रेकअप लेटरमध्ये लिहिले आहे. हे ब्रेकअप लेटर सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी हे ब्रेकअप लेटर सोशल मीडियावर शेअर देखील केले आहे.
सुजाण नावाच्या प्रियकराने प्रेयसी सुप्रियाला हे ब्रेकअप लेटर लिहिले आहे. या ब्रेकअप लेटरमध्ये सुजाणने लिहिले की, “माझी प्रिय एक्स गर्लफ्रेंड २१ व्या शतकात माझ्यासारख्या मुलामध्ये तुझ्यासारख्या हुशार मुलीसोबत रिलेशनमध्ये राहण्याची हिंमत नाही. मी तुझ्यासारख्या मुलीसोबत रिलेशनशीपमध्ये राहू शकत नाही.”
https://www.instagram.com/p/CfhUa_1vGf1/?utm_source=ig_embed&ig_rid=2b68754e-178e-438d-b1ff-33a69f46bb2c
“त्यामुळे आपल्या दोघांमधील हे नाते मला इथेच संपवायचे आहे. जर माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला तुझा मोठा भाऊ समजून माफ कर”, असे सुजाणने ब्रेकअप लेटरमध्ये लिहिले आहे. या ब्रेकअप लेटरचा शेवट सुजाणने अतिशय मजेशीर पद्धतीने केला आहे. त्याने ब्रेकअप लेटरमध्ये शेवटी लिहिले की, “तुझा जुना बॉयफ्रेंड आणि पुढील मोठा भाऊ”
या ब्रेकअप लेटरची सोशल मीडियावर सध्या खूप चर्चा आहे. अनेक युजर्सनी या ब्रेकअप लेटरवर कमेंट केल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिले की, ” हे जबरदस्त पत्र कदाचित गर्लफ्रेंडला धडा शिकवण्याचा प्रयत्न करत आहे.” तर दुसऱ्या एका युजरने कमेंट करत लिहिले की, ” ब्रेकअप झाले हे चांगले झाले नाहीतर लग्नानंतर लेटर लिहिले असते.”
महत्वाच्या बातम्या :-
‘सैराट’ फेम अभिनेता तानाजी गालगुंडे देतोय ‘या’ आजाराशी झुंज, रुग्णालयात उपचार सुरु
एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलं असतं तर मविआ सरकार वाचले असते? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न
मोठी बातमी! ‘सैराट’ फेम अभिनेता तानाजी गालगुंडेला केले रुग्णालयात दाखल