आफ्रिकेत ५२ वर्षांनंतर भेटला ‘उंदरा एवढा हत्ती’, संशोधकांच्या हाती मोठे यश

आफ्रिका | आफ्रिकेत जीबुती येथे साधारण ५० वर्षांपूर्वी नामशेष झालेला उंदराएवढा हत्ती (elephant shrew) सापडला आहे. हा प्राणी जरी तुम्हाला उंदराएवढा दिसत असता तरी हा हत्तीच्या प्रजातीचा जीव आहे. एका सर्व्हेनुसार elephant shrew ला १९७० ला सगळ्यात शेवटी पाहण्यात आलं होतं.

हा हत्ती सापडल्यानंतर पशुप्रेमींमध्ये एक उमेदीची किरण जागी झाली आहे. या हत्तीला Sengis सुद्धा बोलले जाते. याचा संबंध Aardvarks (डुकरसारखा प्राणी) याच्याशी आहे. या प्राण्याला एक मोठे नाक असते त्याचा उपयोग तो किडे खाण्यासाठी करतो.

संपूर्ण जगात याच्या २० प्रजाती असून हा प्राणी फक्त सोमालियात आढळतो. त्यामुळे त्याला सोमाली सेंगी असेही म्हटले जाते. आफ्रिकन देश जीबुतीमध्ये आढळलेल्या या उंदराएवढ्या हत्तीची ओळख अमेरिकेच्या ड्युक विद्यापीठाचे संशोधक स्टीव्हन हेरिटेज यांनी पटवली आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की, हा प्राणी पुन्हा आढळल्याने आम्ही आश्चर्यचकित झालो आहोत. जीबुतीमध्येही हा जीव आढळतो याची आम्हाला कल्पनाही नव्हती. तसेच उंदराएवढ्या प्राण्याला हत्तीसारखी सोंड आणि शेपूट पाहून आम्ही थक्क झालो. असे ते म्हणाले आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.