अखेर १९ दिवसांनंतर आर्यनच्या दिनक्रमात झालाय बदल, जेलमधील आरतीला सहभागी होतो आणि..

क्रुझ ड्रग्स पार्टी प्रकरणात अटक करण्यात आलेला शाहरुख खानचा मुलगा सध्या आर्थर रोड जेलमध्ये आहे. गेल्या १९ दिवसांपासून तो तुरुंगात आहे. बुधवारी एनडीपीएसच्या विशेष कोर्टाने आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळला. शाहरुख खान देखील आपल्या मुलाला सोडवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करताना दिसत आहे.

परंतू यातूनही काही मार्ग निघत नाही आहे. कोर्टाकडून सतत जामीन अर्ज फेटाळून लावल्यामुळे आर्यनला आता फक्त देवा कडून आशा उरल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून आर्यन हा जेलमध्ये होणाऱ्या आरतीमध्ये सहभागी होत असल्याची माहिती समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुरुवातीला आर्यन शांत एका कोपऱ्यात काही न खाता पिता बसून राहायचं पण आता त्याच्या दिनक्रमात थोडा बदल झाल्याचे दिसून येत आहे. देवाकडे प्रार्थना करून आपल्याला जामीन मिळेल या आशेवर तो आरतीमध्ये सहभागी होत आहे.

तसेच आरती संपेपर्यंत तो त्या ठिकाणी असतो, अशीही माहिती समोर येत आहे. आर्यन ८ ऑक्टोबर पासून आर्थर रोड जेलमध्ये आहे. सलग चार पाच वेळा त्याच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली असून अद्याप त्याला जामीन मिळालेला नाही. आर्यनला जेलमधील खाणं पिणं आवडत नाही. त्यामुळे तो बॅरेकच्या बाहेर येत नव्हता.

पण काही दिवसांपासून तो आरती मध्ये सहभागी होऊ लागला आहे. आर्यनला ज्या बॅरेकमध्ये ठेवले आहे. त्या ठिकाणी एक मंदिर आहे. या मंदिरात रोज संध्याकाळी आरती होते. आर्यन तिथे आरती संपेपर्यंत उपस्थित असतो.

गेल्या सुनावणी दरम्यान NDPS च्या न्यायलयाने काल आर्यनचा जामीन अर्ज फेटाळला. कोर्टाने म्हटले होते की, प्रथमदृष्ट्या आर्यन ड्रग्स प्रकरणी सामील असल्याचे दिसून आले आहे. तसेच त्याच्या व्हॉट्सॲप चॅट वरून समजते की तो ड्रग्स पेडलरच्या संपर्कात होता.

 

महत्वाच्या बातम्या
आर्यन नीट जेवत नाही, बॅरेकमध्ये रडत बसतो, वॉशरूमलाही जात नाही, जेल स्टाफला त्याची चिंता
राकेश झुनझुनवालांनी मोदींची तुलना केली बायकोशी, म्हणाले सुहागरात्रीला..; व्हिडीओ तुफान व्हायरल
अभिनेत्याने १३ वर्षांपुर्वी मारली होती जेनेलियाला थप्पड, अखेर रितेशने बदला घेतलाच; दणादण पंच मारत केले घायाळ..
वाऱ्याची झुळूक आली अन् नको तेच दिसलं! जान्हवी कपूर झाली Oops मोमेंटची शिकार; पहा व्हिडिओ…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.