अफगाणिस्तानचा खेळाडू राशिद खानने कर्णधारपदाचा दिला राजीनामा; धक्कादायक सत्य आलं समोर

नवी दिल्ली। अफगाणिस्तानचा खेळाडू राशिद खानने कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. त्याने ट्विट करत ही माहिती दिली आहे. व राजीनामा देण्यामागचं कारणही त्याने स्पष्ट केलं आहे. टी २० विश्वचषक २०२१ साठी अफगाणिस्तानने आपल्यचा १८ सदस्यांच्या संघाची घोषणा केली आहे.

मात्र घोषणा केल्यानंतर राशिद खानने राजीनामा दिला व आपल्या चाहत्यांना ट्विट करत माहिती दिली. राजीनामा देण्यामागचं कारण म्हणजे स्पर्धेसाठी संघाची निवड केली त्या बैठकीला आपल्याला बोलवण्यात आलं नव्हतं. राशिद खान म्हणाला की, अफगाणिस्तान क्रिकेट नियामक मंडळाने या स्पर्धेसाठी संघाची निवड केली त्या बैठकीला आपल्याला बोलवण्यात आलं नव्हतं.

म्हणजेच विश्वचषकासारख्या महत्वाच्या स्पर्धेसाठी संघ निवड करताना राशिद खानशी कोणतीही चर्चा केली नाही, त्याचा सल्ला घेतला नाही. कर्णधारालाच डावलून हा संघ निवडण्यात आलाय. त्यामुळेच संघ जाहीर होताच राशिद खानने कर्णधारपद सोडलं आहे.

ही संपूर्ण माहिती राशिद खानने आपल्या चाहत्यांना गुरुवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास ट्विटर अकाऊंटवरून माहिती दिली. माहिती मिळताच सर्वत्र चर्चा रंगल्या आहेत.

अफगाणिस्तानच्या संघाची यावेळी चांगली निवड करण्यात आली आली. संघात ६ गोलंदाज, ४ अष्टपैलू खेळाडू आहेत. अफगाणिस्तान क्रिकेट मंडळाने दोन राखीव खेळाडू ठेवले आहे. अफगाणिस्तानच्या संघात राशिद खान, हजरतुल्लाह जजाई, मोहम्मद नबी, मोहम्मद शहजाद, मुजीब उर रहमान, कायस अहमद आणि नवीन उल हकसारखे टी-२० स्पेशलिस्ट खेळाडू आहेत.

राशिद खान आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाचा भाग आहे. जेव्हा तालिबान्यांनी अफगाणिस्तान ताब्यात घेण्यास सुरवात केली होती, तेव्हा हा खेळाडू देशात नव्हता. राशिद सध्या इंग्लंडमध्ये खेळल्या जाणाऱ्या द हंड्रेड स्पर्धेत सहभागी होणार आहे.
महत्वाच्या बातम्या
माते तुला सलाम! जीव मुठीत घेऊन गर्भवती महिलेने थरमोकॉलच्या तराफ्यातून गाठलं रुग्णालय; गोंडस मुलाला दिला जन्म 
एकेकाळी ‘या’ व्यक्तीची तोंडभरून स्तुती करणारी ऐश्वर्या आज ‘त्या’ व्यक्तीचा चेहरा देखील पाहत नाही कारण… 
हवाई दल म्हणाले, धावपट्टीला दीड वर्ष लागतील; गडकरी म्हणाले, १५ दिवसांत धावपट्टी बांधून देतो… 
धोनीच्या निवडीमुळे संघात वाढू शकतो तणाव, सुनील गावसकरांनी सांगितले ‘ते’ कारण..

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.