हातात लॅपटॉप, शेजारी एके-४७ अन् शिक्षण मात्र शुन्य; ‘हा’ आहे तालिबानच्या रिझर्व बँकेचा प्रमुख

अफगाणिस्तानच्या कब्जेनंतर तालिबान मनाला येईल त्या गोष्टी करताना दिसत आहे. आता काळ्या पैशाचा शोध करणाऱ्या हाजी मोहम्मद इद्रिसला देशाच्या मध्यवर्ती बँक द अफगाणिस्तान बँक (डीएबी) चे प्रमुख म्हणून नियुक्त केले आहे.

तालिबानी अतिरेक्यांनी या नियुक्तीद्वारे देशातील बँकांना आश्वासन दिले आहे की त्यांना पूर्णतः कार्यरत आर्थिक व्यवस्था हवी आहे. दरम्यान, हाजी मोहम्मद इद्रिसचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये तो एका बाजूला लॅपटॉपद्वारे सर्वोच्च बँकेची ‘कमांड’ घेताना दिसत आहे, तर दुसरीकडे त्याच्या टेबलवर एके -४७ सारखी रायफल ठेवलेली आहे.

मात्र, पैशाच्या पुरवठ्याची व्यवस्था कशी केली जाईल, हे तालिबानने अद्याप सांगितले नाही. अलीकडेच, तालिबानचे प्रवक्ते जबीउल्लाह मुजाहिद यांनी इद्रिसच्या नियुक्तीची घोषणा केली. जबीउल्लाहने सांगितले होते की इद्रिस देशाच्या सर्वोच्च बँकेचे कार्यकारी प्रमुख असतील.

तसेच ते म्हणाले होते की इद्रिस सरकारी संस्था संगठित करतील, बँकिंगशी संबंधित समस्या सोडवतील आणि लोकांच्या समस्या कमी करतील. इद्रीसचे रायफलसोबत व्हायरल झालेला फोटो हे सांगून देतो की इद्रिस समस्या कसे सोडवणार आहे.

अफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांनी इद्रीसला इशारा दिला आहे की तालिबानने काळा पैसा लाटणाऱ्या एका व्यक्तीला देशाच्या सर्वोच्च बँकेचे प्रमुख म्हणून नियुक्त केले आहे. सालेह यांनी म्हटले होते की, काळ्या पैशाचा शोध घेणारा इद्रीस अल-कायदा समर्थक आणि तालिबान यांच्यातील पैशांचे व्यवहार सुलभ करण्यासाठी वापरत होता,

तालिबानच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितले की, इद्रिस हा मूळचा जावाजान प्रांताचा आहे. मुल्ला अख्तर मन्सूर सोबत तो बराच काळ तालिबानच्या आर्थिक घडामोडींवर देखरेख करत होता. २०१६ मध्ये अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात मुल्ला अख्तर मारला गेला. इद्रिसच्या बँकिंगविषयीच्या समजुतीबद्दल सार्वजनिकरित्या उपलब्ध माहिती नाही. त्याने किती शिक्षण घेतले आहे हे अद्याप माहित नाही. त्याची एकमेव क्षमता आहे की तो तालिबानसाठी काळा पैसा पांढऱ्यामध्ये रुपांतरीत करायचा.

एका तालिबानीने सांगितले की इद्रिसने धार्मिक पुस्तके देखील वाचली नाहीत पण तो आर्थिक बाबींचा तज्ञ आहे. अफगाणिस्तानमध्ये तालिबानी राजवट आल्यानंतर जनता पैसे काढण्यासाठी धडपडत आहे. बँकांबाहेर लांब रांगा आहेत आणि सरकारने एका मर्यादेच्या बाहेर पैसे काढता येणार नाहीत अशी मर्यादा घातली आहे.

महत्वाच्या बातम्या-

मोठी बातमी! वारकरी, कीर्तनकारांना आता महिन्याला पाच हजार मानधन, सरकारचा मोठा निर्णय
राणे कुटुंबाविरूद्ध लुकआऊट नोटीस! संतप्त नितेश राणेंचा ठाकरे सरकारला इशारा, म्हणाले…
सुंदर पिचाई यांना आपल्या पत्नीला भेटायला उशीर झाला आणि गुगल मॅप्सची स्थापना झाली, वाचा किस्सा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.