Share

हृदयद्रावक! एक वेळच्या भाकरीसाठी विकावी लागतीये किडनी आणि मुलं, ‘या’ देशात भीषण परिस्थिती

Afganistan-situation

तालिबानने १५ ऑगस्ट रोजी अफगाणिस्तानवर(Afganistan) ताबा मिळवला होता, त्यानंतर अफगाणिस्तानला आंतरराष्ट्रीय मानवतावादी मदत थांबवण्यात आली आहे. अफगाणिस्तानचे अन्न संकट इतके गडद झाले आहे की, देशातील अर्ध्याहून अधिक लोक उपासमारीच्या मार्गावर आहेत. कडाक्याच्या थंडीत भुकेने झगडणाऱ्या लाखो लोकांचे जीवन धोक्यात आले आहे.(afganistan bad situation people died because of lack food)

अफगाणिस्तानमधील लोक स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी आपली किडनी आणि मुलं देखील विकत आहेत. तालिबान सत्तेवर आल्यापासून लोकांची अवस्था बिकट झाली आहे. एक वेळची भाकरी मिळवण्यासाठी लोक शरीराच्या अवयवांचा व्यापार करत आहेत. अफगाणिस्तानमध्ये फार वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे.

अफगाणिस्तानमधील हेरात(Hairat) शहरापासून सुमारे २० किलोमीटर अंतरावर असलेल्या शहार-ए-सेबज भागात हजारो अफगाणी पश्तून लोक कसे तरी आपले जीवन जगत आहेत. तालिबान आणि मागील सरकारमधील संघर्ष आणि गेल्या ४ वर्षांच्या दुष्काळामुळे त्यांना त्यांची स्वतः ची घरे सोडावी लागली आहेत.

शहार-ए-सेबज या भागात मातीची घरे आहेत या भागात वीज आणि पाणी नाही. थंडीपासून वाचण्यासाठी या घरांमध्ये कोणताही उपाय नाही. सध्या थंडीची परिस्थिती बिकट होत असताना बहुतांश घरांमध्ये स्टोव्हही नाही. ज्यांच्याकडे चुली आहेत, ते घर गरम करण्यासाठी लाकूड आणि कोळशाऐवजी प्लास्टिक जाळतात. त्यामुळे विषारी धूर पसरून जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

या भागात राहत असलेल्या ३८ वर्षांच्या अब्दुलकादिर यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “मी दिवसभर फक्त चहा पितो आणि कोरडी भाकरी खातो. माझ्याकडे उपचारासाठीही पैसे नाहीत. मी माझी एक किडनी दीड लाख अफगाणी (सुमारे 1 लाख 9 हजार रुपये) मध्ये विकण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेलो होतो.”

“हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर डॉक्टरांनी मला सांगितले की, जर माझ्यावर शस्त्रक्रिया झाली आणि माझी किडनी काढली गेली तर मी मरेन. पण तरीही मला माझी किडनी विकायची आहे. आमची आर्थिक परिस्थिती इतकी बिकट आहे की, मी माझे एक मूल १५०,००० अफगाणींना विकायला तयार आहे. याद्वारे मी माझ्या कुटुंबातील इतर सदस्यांना वाचवू शकतो”, असे अब्दुलकादिर यांनी मुलाखतीत सांगितले.

या भागात लोकांना कोणत्याही प्रकारचा रोजगार नाही. तरुण आणि तरुण शहरांमध्ये भीक मागतात आणि कचऱ्यातून प्लास्टिक आणि कागद गोळा करत आहेत. स्त्रियाही व्यापाऱ्यांनी आणलेल्या लोकरीपासून सूत काततात. लोक दररोज जास्तीत जास्त ५० ते १०० अफगाणी (सुमारे ३६ ते ७२ रुपये) कमवू शकतात.

महत्वाच्या बातम्या :-
‘या’ अनोख्या सायकलची पुर्ण देशभरात चर्चा, जो कोणी पाहतो सेल्फी घेतल्याशिवाय राहत नाही
“हमारे पार्टी का नाम सुनकर फ्लॅावर समझे क्या? फ्लॉवर नहीं फायर है”
YouTube Shorts मधून कमवा महिन्याला ७.५ लाख रुपये, फक्त करावे लागेल ‘हे’ काम

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now