नागपूर शहरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadanvis) यांच्याविरोधात याचिका दाखल करणारे वकील अॅड. सतीश उके यांच्या घरावर ईडीने छापा टाकला आहे. अॅड. सतीश उके हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरोधातील खटल्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वकील आहेत.(advocate satish uke home ED raid)
आज सकाळी अॅड. सतीश उके यांच्या नागपूरमधील पार्वती नगर भागात असलेल्या घरावर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडीने) छापा टाकला आहे. सध्या त्या घरामध्ये अॅड. सतीश उके आणि त्यांचा भाऊ प्रदीप उके वास्तव्यास आहेत. यावेळी ईडीने छापा टाकताना सुरक्षेसाठी सीआरपीएफ जवानांची देखील मदत घेतली आहे.
ईडीने कोणत्या प्रकरणात अॅड. सतीश उके यांच्यावर कारवाई केली आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.२०१४ मध्ये निवडणुकीत दोन गुन्हे लपवण्यासंदर्भात अॅड. सतीश उके यांनी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती. तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरींविरोधातील एका खटल्यात अॅड. सतीश उके हे काँग्रेस नेते नाना पटोले याचे वकील आहेत.
अॅड. सतीश उके हे हाय प्रोफाईल वकील म्हणून ओळखले जातात. अॅड. सतीश उके यांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर देखील आरोप केले होते. तेलगी घोटाळ्यात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचा सहभाग आहे, असा आरोप करत अॅड. सतीश उके यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले होते.
काही दिवसांपूर्वी नागपुरातील एका जमिनीच्या व्यवहाराबाबत गुन्हे शाखेने अॅड. सतीश उके यांना नोटीस बजावली होती. एका वृद्ध महिलेची फसवणूक करत त्यांची दीड एकर जमीन बळकावल्याचा आरोप अॅड. सतीश उके आणि त्यांच्या भावावर करण्यात आला होता. याचा प्रकरणात पोलिसांनी त्यांनी नोटीस बजावली होती.
काही दिवसांपूर्वी अॅड. सतीश उके यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. यापूर्वी देखील अॅड. सतीश उके आणि खासदार संजय राऊत यांच्यात अनेक भेटी झाल्या आहेत. अॅड. सतीश उके यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विरोधात भूमिका घेतली होती. त्याचबरोबर फोन टॅपिंग प्रकरणात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याबाजूने अॅड. सतीश उके यांनी खटला लढवला आहे.
महत्वाच्या बातम्या :-
पॅनकार्ड आधार कार्डला जोडण्यासाठी आजचाच कालावधी, नाहीतर भरावा लागेल ‘इतका’ भुर्दंड
शाहरूखचा ‘पठाण’ चित्रपट लीक झाला? वाचा व्हायरल पोस्टमागील सत्य
तु ज्या महिलांवर अत्याचार केलेत त्या एक दिवस.., सलमान खानला एक्स गर्लफ्रेंडने दिली धमकी