शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीकडून गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तसेच ईडीने परिवहन मंत्री अनिल परब(Anil Parab) यांच्या शासकीय निवासस्थानासह ७ ठिकाणी छापेमारी केली आहे. ईडीने मुंबई, पुणे, रत्नागिरी या ठिकाणी छापे टाकून कारवाई केली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.(advocate gunratn sdavarte celebrate anil parab ED action)
ईडीने परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर केलेल्या कारवाईवर वकील गुणरत्न सदावर्ते यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जैसी करणी वैसी भरणी. ही तरं कर्माची फळे आहेत, अशा शब्दांत वकील गुणरत्न सदावर्ते यांनी अनिल परब यांच्यावर निशाणा साधला आहे. वकील गुणरत्न सदावर्ते यांनी ईडीने परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर केलेल्या कारवाईचे समर्थन केले आहे.
यावेळी वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यासोबत एसटी कर्मचारी देखील उपस्थित होते. अनिल परब यांच्यावर झालेल्या कारवाईनंतर वकील गुणरत्न सदावर्ते आणि एसटी कर्मचाऱ्यांनी लाडू खाऊन आनंद साजरा केला आहे. यावेळी वकील गुणरत्न सदावर्ते म्हणाले की, “ढवळ्या शेजारी पवळ्या गेला, वाण नाही पण गुण लागला.”
“लवासा, सिंचन, आदर्श हे सगळ्या गोष्टीचा पिठारा ज्यांच्याकडे आहे, त्यांच्या नादाला लागल्यानंतर काही गुण अंगात संचारणार यात दुमत नाही. एसटी कामगारांची तळतळ, हळहळ याचेच हे परिणाम आहेत. जैसी करणी वैसी भरणी, ही कर्माची फळे आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका सर्वसामान्य कष्टकरी माणसाला त्या पदावर बसवायला हवं होतं”, असे वकील गुणरत्न सदावर्ते म्हणाले आहेत.
ईडीने अनिल परब यांच्यावर केलेल्या कारवाईनंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी देखील अनिल परब यांच्यावर टीका केली आहे. राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख, नवाब मलिक सध्या तुरुंगात आहेत. आता परिवहन मंत्री अनिल परब यांना देखील तुरुंगात जाण्यासाठी तयार राहावे. तसेच अनिल परब यांनी बॅग भरून तयार राहावे, असा खोचक टोला किरीट सोमय्यांनी लगावला आहे.
आज मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्या घरावर ईडीने धाड टाकली. ईडीचे अधिकारी सकाळीच परब यांच्या वांद्रे येथील घरी आणि मरिन ड्राईव्हमधील सरकारी निवासस्थानी दाखल झाले होते. ईडीच्या अधिकाऱ्यांकडून अनिल परब यांची चौकशी केली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
महत्वाच्या बातम्या :-
गुजरात फायनलमध्ये पोहोचताच हार्दिक पांड्याच्या डोक्यात गेली हवा, म्हणाला, माझं नाव विकलं जातं त्यामुळं..
एका पायावर लंगडत शाळेत जाणाऱ्या अपंग मुलीच्या मदतीला धावून आला सोनू सूद; म्हणाला…
‘आता ही बैठक कधी झाली?’ पवारांचा बृजभूषणसोबत दुसरा फोटो आला समोर, राज ठाकरेंच्या आरोपांवर शिक्कामोर्तब