कर्नाटक(Karanataka) उच्च न्यायालयाने(High Court) हिजाब बंदीविरोधातील सर्व याचिका फेटाळून लावल्या आहेत. हिजाब घालणे ही अत्यावश्यक धार्मिक प्रथा नाही, तसेच हिजाब हा इस्लामियांचा अविभाज्य भाग ही नाही, असे कर्नाटक न्यायालय म्हणाले आहे. यावर अधिवक्ता असीम सरोदे(Aseem Sarode) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हिजाब घालणे हा धार्मिक स्वातंत्र्यांचा भाग नाही हे संविधानिक सत्य आता आपण स्वीकारले पाहिजे, असे सरोदे म्हणाले आहेत.(Advocate Aseem sarode statement on Hizab Banned)
हिजाब बंदीविरोधात न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर बोलताना असीम सरोदे म्हणाले की, “हिजाब बंदी योग्य आहे. शाळा महाविद्यालयांमध्ये हिजाब घालण्याची परवानगी नाकारली जाणे योग्य आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाने अत्यंत महत्वाचा निर्णय दिला आहे. त्याचे स्वागत केले पाहिजे. हिजाब घालणे हा धार्मिक स्वातंत्र्यांचा भाग नाही हे संविधानिक सत्य आता आपण स्वीकारले पाहिजे.” असे असीम सरोदे म्हणाले आहेत.
असीम सरोदे पुढे म्हणाले की, “हिजाब धार्मिक स्वातंत्र्याचा भाग नाही या निर्णयाने आपण संवैधानिक होण्याची एका पायरी वर चढलो आहे. आपला संवैधानिक होण्याचा प्रवास सुरु राहिला तर आपण हे नक्की समजून घेतले पाहिजे की, कोणत्याही देवाच्या मूर्तिपूजा, आरत्या शाळा आणि कॉलेजमध्ये होणे हा सुद्धा धार्मिक स्वातंत्र्याचा भाग नाही”, असं स्पष्ट मत अधिवक्ता असीम सरोदे यांनी मांडलं आहे.
“हिजाब हा विषय आता सर्वोच्च न्यायालयात नक्की जाईल. हा विषय सर्वोच्च न्यायालयात जावा अशी कट्टरवादी मुस्लिम राजकारण करणाऱ्यांची इच्छा आहे, तशीच इच्छा कट्टरवादी हिंदुत्व मिरवणाऱ्यांची आहे. सामान्य नागरिकांनी या दोन्ही प्रवृतींपासून दोन हात लांब राहावे”, असा सल्ला अधिवक्ता असीम सरोदे यांनी दिला आहे.
काही दिवसांपूर्वी कर्नाटकातील उडपी जिल्ह्यातील कुंदापूर येथील सरकारी कनिष्ठ महाविद्यालयात हिजाब वरून वाद सुरु झाला होता. या महाविद्यालयात हिजाब घालून येणाऱ्या मुलींना प्रवेश नाकारण्यात आला होता. कर्नाटक राज्य सरकारने जारी केलेल्या ड्रेस कोडच्या नियमानुसार महाविद्यालयातील अधिकाऱ्यांनी काही मुस्लिम मुलींना महाविद्यालयात हिजाब घालून येण्यास विरोध केला होता.
यावर महाविद्यालयांतील मुस्लिम मुलींनी या निर्णयाला विरोध करत निदेर्शने केली होती. तसेच पालकांनी देखील याविरोधात आंदोलन केलं होतं. त्याचवेळी काही हिंदू विद्यार्थ्यांनी भगवे उपरणे घालून या मुलींचा विरोध केला होता. यावरून हा वाद आणखीनच चिघळला होता. त्यानंतर या प्रकरणात राजकीय पक्षांनी देखील भाग घेतला होता.
महत्वाच्या बातम्या :-
‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपट पाहून लालकृष्ण अडवाणी रडले? जाणून घ्या व्हायरल व्हिडिओमागील सत्य
अनुराग कश्यपवर लैंगिक छळाचा आरोप करणाऱ्या अभिनेत्रीला चोरी करताना अटक; चौकशीत झाला मोठा खुलासा
चित्रपट करमुक्त करणे म्हणजे काय? निर्मात्यांना त्याचा काय फायदा होतो? वाचा सविस्तर..