शेतकऱ्यांना पाठिंबा देण्याऐवजी तू जाहिराती कसल्या करतोय; अक्षयकुमारला झापले

दिल्ली । सध्या दिल्लीमध्ये शेतकऱ्यांनी कृषी कायद्याला विरोध करत आंदोलन सुरू केले आहे. यावरून आता देशभरातील शेतकऱ्यांना या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. अनेक कलाकारांनी देखील पाठिंबा दर्शवला आहे.

सगळीकडून पाठिंबा मिळत असताना अभिनेता अक्षय कुमारने शेतकरी आंदोलनावर अजूनही प्रतिक्रिया दिली नाही. यामुळे त्याच्यावर टीका केली आहे. सोशल मीडियावर तो चांगलाच ट्रोल होत आहे.

अक्षय कुमारने सोशल मीडियावर ‘पगार बुक’ ची एक जाहिरात शेअर केली. या जाहिरातीत मासिक वेतन, अडेंटेन्स आणि पेमेंट यासारख्या आवश्यक गोष्टींचा डिजिटल व्यवहार कसा करावा हे तो सांगताना दिसत आहे. यात ‘अब इंडिया का हर बिजनेसमॅन होगा डिजिटल, असे म्हणताना तो दिसत आहे.

आता या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्याची ही जाहिरात पाहिल्यावर नेटकऱ्यांनी त्याच्यावर टीकास्त्र सोडले आहे. ‘एकीकडे शेतकरी त्यांच्या हक्कासाठी लढा देत आहेत. अशा काळात त्यांना पाठिंबा देण्याऐवजी तू जाहिराती कसल्या करतो’, असा प्रश्न नेटकऱ्यांनी त्याला विचारला आहे.

दरम्यान दिल्लीसह संपूर्ण भारतात हे आंदोलन पेटले आहे. सर्व स्थरातून या आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे. येणाऱ्या काळात हे आंदोलन पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.