इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का? वाचून थक्क व्हाल

देशात गेल्या काही दिवसांपासून इलेक्ट्रिक वाहनांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. ग्राहकांनी इलेक्ट्रिक वाहनांना पसंती दिल्यानंतर अनेक ऑटो कंपन्या आपले इलेक्ट्रिक वाहन लाँच करत आहेत. तसेच सरकारी योजनेच्या अंतर्गत इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. भविष्यात वाहतूक क्षेत्रामध्ये इलेक्ट्रिक वाहनांची मोठी भुमिका असणार आहे.

इलेक्ट्रिक वाहनांचा सर्वात मोठा फायदा म्हणजे या वाहनांसाठी येणारा दैनंदिन खर्च कमी असतो. या वाहनांसाठी रनिंग खर्च आणि मेंटेंनन्स खर्च पेट्रोल वाहनांच्या तुलनेत खूप कमी येतो. सामान्य पेट्रोल कारपेक्षा इलेक्ट्रिक कारचा खर्च ५० टक्के कमी आहे. तसेच इलेक्ट्रिक वाहनांचे मेकॅनिकल पार्ट अधिक विश्वसनीय आहेत.

इलेक्ट्रिक वाहनांसाठी नवीन तंत्रज्ञान विकसित होत आहे. यामध्ये आपल्याला चर्जिंग स्टेशन्स उपलब्ध करून दिली जाणार आहेत. या स्टेशनवर डिश्चार्ज किंवा पॉवर कमी झालेल्या बॅटरीच्या बदल्यात चार्ज केलेली बॅटरी मिळणार आहे. या तंत्रज्ञानाचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरल्यानंतर याचा मोठा फायदा इलेक्ट्रिक वाहन खरेदीदाराला होईल. विविध कंपन्या या तंत्रज्ञानावर काम करत आहेत.

इलेक्ट्रिक वाहनांमध्ये आरामदायी आणि अधिक सहज ड्रायव्हिंग करता येते. गाडीचा आवाज होत नसल्याने चालवताना गोंधळ होत नाही. कार गाडीच्या केबिनमध्ये कंफर्ट मिळतो. तसेच रिजनरेटिव्ह ब्रेकिंगच्या सहाय्याने पुन्हा बॅटरी चार्ज करु शकता.

आजचे जग प्रदुषणाशी लढत आहे. भविष्यात हवेचे प्रदुषण नियंत्रणात आणण्यासाठी आणखी उपाययोजना केल्या जाणार आहेत. यासाठी शहरांमध्ये शून्य उत्सर्जन झोन ठेवण्यात येणार आहेत. रस्त्यावर इलेक्ट्रिक वाहने शून्य उत्सर्जन देतात. यामुळे कार्बन डायऑक्साइड तसेच इतर धोकादायक ग्रीनहाऊस वायू कमी होईल.

महत्वाच्या बातम्या-
मारुती सुझुकी लवकरच बाजारात आणणार नवीन इलेक्ट्रिक OMNI, किंमत असेल फक्त…
बाईक चालकांसाठी सरकारने बदलले नियम; जाणून घ्या महत्वाचे ५ नियम
‘ही’ सोपी ट्रिक वापरत १० वर्षाच्या चिमुकल्याने शेअर मार्केटमधून कमावले लाखो रूपये
अर्थमंत्र्यांचे बजेट ऐकूण संसदेत कंटाळलेल्या राहुल गांधींचे फोटो व्हायरल, मीम्सचा पाऊस

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.