Share

पठाणचा प्रदर्शनाआधीच धुमाकूळ; अ‍ॅडव्हान्स बुकिंग सुरू होताच भारतासह परदेशातही हाऊसफुल्ल

शाहरुख खानच्या पठाण या चित्रपटावरुन गदारोळ झाला होता. पठाण चित्रपटातील एक गाणे काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाले होते. ‘बेशरम रंग’ या गाण्याचे नाव आणि या चित्रपटातील अभिनेत्री दीपिका पदुकोणने परिधान केलेली भगव्या रंगाची बिकिनी यामुळे चित्रपटाला सोशल मीडियावर खूप ट्रोल केले जाऊ लागले.

लोकांनी चित्रपटाबाबत अनेक मीम्सही बनवले. त्यानंतर अनेक संघटनांनी या चित्रपटावर आक्षेप घेत बहिष्कार टाकण्याची मागणी केली आहे. नुकतेच सेन्सॉर बोर्डानेही चित्रपटात आवश्यक बदल करण्याचे आदेश दिले आहेत. एवढे सगळे करूनही चित्रपटाचे एडवांस बुकिंग सुरू झाले आहे.

परदेशात या चित्रपटाला चांगले रिझल्ट मिळत आहेत. वृत्तांवर विश्वास ठेवला तर शाहरुखच्या ‘पठाण’ चित्रपटाने जर्मनीत रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. तिथे शोच्या पहिल्या दिवशीचे सर्व शो हाऊसफुल्ल जात आहेत. शाहरुखला तसा ग्लोबल स्टार मानला जातो, हे यावरून स्पष्ट होते.

जगभरातून त्याचे फॅन फॉलोइंग भारतात आहे. या चित्रपटाने जर्मनीमध्ये एडवांस बुकिंग करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होण्यापूर्वीच इतका जबरदस्त प्रतिसाद मिळणे ही त्याच्या निर्मात्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

रिपोर्ट्सनुसार, पठाण चित्रपटाची एडवांस बुकिंग 28 डिसेंबरपासून जर्मनीमध्ये सुरू झाली होती. ज्यामध्ये चित्रपट रिलीजच्या पहिल्या दिवशीच्या सर्व शोचे आगाऊ बुकिंग हाऊसफुल्ल आहे. हा प्रतिसाद पाहून या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

या चित्रपटाबाबत सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांनी चित्रपटाच्या निर्मात्यांना ‘पठाण’मध्ये आवश्यक बदल करून तो रिलीजपूर्वी सादर करण्यास सांगितले आहे. चित्रपटातील ‘बेशरम रंग’ या गाण्यासोबतच काही सीन्सही चित्रपटातून काढून टाकण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पठाण हा चित्रपट २५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.

महत्वाच्या बातम्या
pune : जिथे भाईगिरी केली तिथेच पोलिसांनी काढली धिंड, पुण्यातील तरुणांचा व्हिडिओ पुन्हा आला समोर
Gulabrao patil : लोकसभा निवडणूकीत शिंदे गटाला एकही जागा मिळणार नाही? गुलाबराव पाटलांचे सुचक वक्तव्य
छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर की स्वराज्यरक्षक? महाराष्ट्रातील दिग्गज इतिहासकार म्हणाले….

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now