Share

कौतुकास्पद! औरंगाबाद खंडपीठाच्या वकील संघात ॲड. ईश्वर नरोडे पाटलांचा दणदणीत विजय!

युवा वकिलांमध्ये आपल्या कार्यक्षमतेची आणि नेतृत्वाची छाप पाडणारे तसेच नव्या पिढीतील एक उमदे नेतृत्व म्हणून ओळख निर्माण करणारे ॲड. ईश्वर दिनकर नरोडे पाटील यांनी औरंगाबाद खंडपीठाच्या उच्च न्यायालय वकील संघाच्या सदस्यपदी प्रचंड मतांनी विजय मिळवला आहे. त्यांच्या या घवघवीत यशाने वकिली क्षेत्रातली त्यांची वाढती लोकप्रियता पुन्हा एकदा ठळकपणे अधोरेखित झाली आहे.

या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत एकूण १२६८ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यापैकी तब्बल ९४७ मते ॲड. नरोडे पाटील ( Ishwar Narode Patil ) यांच्या पारड्यात पडली. हे केवळ मताधिक्य नसून, त्यांच्या नेतृत्वावर आणि कार्यपद्धतीवर वकिलांचा असलेला प्रचंड विश्वास यातून स्पष्ट दिसून येतो. हे मताधिक्य त्यांच्यावरील विश्वासाची पावतीच मानली जात आहे.

Adv. Ishwar Narode Patil Wins Aurangabad Bar Association Election
विशेष म्हणजे, तुलनेने कमी वय असतानाही ॲड. नरोडे पाटील यांनी हे मोठे यश संपादन केले आहे. त्यांचे हे यश त्यांच्या अथक परिश्रमाचे, जिद्दीचे आणि प्रभावी जनसंपर्काचे फलित आहे. आतापर्यंत त्यांनी गरीब, वंचित आणि न्यायासाठी झगडणाऱ्या घटकांसाठी केलेले अथक प्रयत्न, त्यांचा प्रामाणिकपणा आणि सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्याची त्यांची सहज शैली, या सर्वांचा संगम त्यांच्या या ऐतिहासिक विजयामागे आहे. समाजातील गरीब आणि वंचित घटकांसाठी काहीतरी करण्याची त्यांची तळमळ आणि धडपडच या विजयाला कारणीभूत ठरली.

ॲड. नरोडे पाटील हे राज्य वकील संघाचे उपाध्यक्ष अमोल शिवाजीराव सावंत यांचे कनिष्ठ सहकारी आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ॲड. नरोडे पाटील यांनी कायद्याच्या क्षेत्रात स्वतःचे एक वेगळे आणि प्रभावी स्थान निर्माण केले आहे. या विजयाचे श्रेय ते केवळ स्वतःला न देता, आपले गुरु, सर्व सहकाऱ्यांना देतात.

विजयानंतर आपले मनोगत व्यक्त करताना ॲड. ईश्वर नरोडे पाटील यांनी अतिशय नम्रपणे प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “ही निवड केवळ माझा सन्मान नाही, तर वकील संघाकडून समाजासाठी अधिक जबाबदारीने आणि प्रामाणिकपणे काहीतरी चांगलं करण्याची मला मिळालेली संधी आहे.” पुढे ते म्हणाले, “हा विजय माझ्या गुरुजनांचा, माझ्या सर्व सहकाऱ्यांचा आहे.”

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now