Share

माझी हत्या होऊ शकते, हे सगळं शरद पवारांचं कारस्थान, ऍड. गुणरत्न सदावर्तेंचा खळबळजनक दावा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर काल एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्या प्रकरणी सरकारी कामात अडथळा आणल्यामुळे मुंबई पोलिसांनी ॲड. गुणरत्न सदावर्ते(Gunratn sadvarte) यांना अटक केली होती. त्यानंतर आज ॲड. गुणरत्न सदावर्ते यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी पोलिसांच्या गाडीतूनच त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.(adv gunratn sdvarte Sensational claim)

यावेळी ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. “राज्य सरकारकडून लोकशाहीचा गळा घोटला जात आहे. एका वकिलाच्या हक्कांवर गदा आणली जात आहे. माझी हत्या होऊ शकते”, अशी प्रतिक्रिया ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी दिली आहे. यावेळी ॲड. गुणरत्न सदावर्ते आपल्या मुलीला पाहून भावुक झाले होते.

शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घराजवळ एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं होतं. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत शरद पवार यांच्या घरात घुसण्याचा देखील प्रयत्न केला होता. यावेळी काही आंदोलनकर्त्यांनी शरद पवार यांच्या घरावर दगडफेक केली होती. तसेच शरद पवारांच्या घराच्या दिशेने चपलांचे जोडे देखील फेकले होते.

या हल्ल्या प्रकरणी एसटी आंदोलक कर्मचाऱ्यांचे वकिल ॲड. गुणरत्न सदावर्ते यांची पोलिसांकडून दीड तास चौकशी करण्यात आली होती. या चौकशीनंतर मुंबईच्या गावदेवी पोलिसांनी त्यांना काल रात्री अटक केली होती. भारतीय दंड विधान 141, 149, 353, 332, 452, 120 ब आणि 448 आदी कलमांच्या आधारे गुणरत्ने यांना अटक करण्यात आली होती.

या अटकेनंतर ॲड. गुणरत्न सदावर्ते यांची पत्नी ॲड. जयश्री पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली होती. हे सगळे शरद पवार यांचे कारस्थान आहे, असा आरोप त्यांनी केला होता. “गुणरत्न सदावर्ते यांना वैद्यकीय तपासणीसाठी पोलिस जे. जे. हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले आहेत. आम्हाला अद्याप एफआयआर दाखवण्यात आलेला नाही”, असे ॲड. जयश्री पाटील यांनी सांगितले होते.

सदावर्ते यांच्या जीविताला काही झालं तर त्याला शरद पवार, दिलीप वळसे पाटील आणि सुप्रिया सुळे जबाबदार असतील, असा आरोप देखील ॲड. जयश्री पाटील यांनी केला आहे. आम्ही पवारांविरोधात सातत्याने बोललो, त्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर काढली, त्यामुळेच सदावर्तेंना ताब्यात घेण्यात आलं आहे, असे ॲड. जयश्री पाटील यांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या :-
सोनम कपूरला मोठा धक्का, घरावर पडला 1.41 कोटींचा दरोडा, ‘या’ 34 व्यक्तींवर संशय
औरंगाबाद हादरले! प्रियकराचा लग्नास नकार, प्रेयसीसह ६ मैत्रिणींनी खाल्ले विष; तिघींचा मृत्यू
एसटी कर्मचाऱ्यांना सदावर्तेंच्या पत्नीच्या नावाने येत आहेत ‘असे’ मेसेज, प्रकरण चिघळणार?

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now