Share

एकेकाळी दातांचे डॉक्टर असलेले गुणरत्न सदावर्ते कसे झाले हायकोर्टातील वकील? जाणून घ्या प्रवास

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर काल एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्या प्रकरणी सरकारी कामात अडथळा आणल्यामुळे मुंबई पोलिसांनी ॲड. गुणरत्न सदावर्ते यांना अटक केली होती. त्यानंतर आज ॲड. गुणरत्न सदावर्ते यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने या प्रकरणात ॲड. गुणरत्न सदावर्ते(Adv. Gunratan Sadavarte) यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.(adv gunratn sadvarte life journey)

गेल्या काही महिन्यांपासून ॲड. गुणरत्न सदावर्ते चर्चेत आहेत. सुरवातीला ॲड. गुणरत्न सदावर्ते यांची ओळख एसटी कर्मचाऱ्यांचे वकील अशी होती. ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी न्यायालयात एसटी कर्मचाऱ्यांची बाजू मांडली होती. ॲड. गुणरत्न सदावर्ते यांचा प्रवास आकर्षक आहे. दातांचे डॉक्टर ते एसटी कर्मचाऱ्यांचे वकील असा प्रवास असणाऱ्या ॲड. गुणरत्न सदावर्ते यांची आपण आज माहिती घेणार आहोत.

नांदेड शहरातील एका कुटुंबात ॲड. गुणरत्न सदावर्ते यांचा जन्म झाला होता. त्यांचे बालपण नांदेड शहरातील सोमेश कॉलनीत गेले. त्यांच्या वडिलांचे नाव निवृत्ती सदावर्ते असे आहे. निवृत्ती सदावर्ते हे पोलीस खात्यात कर्मचारी होते. निवृत्ती सदावर्ते यांना गुणरत्न सदावर्ते आणि राजरत्न सदावर्ते अशी दोन मुले आहेत. राजरत्न सदावर्ते हे सध्या मुंबईमध्ये डॉक्टर आहेत.

ॲड. गुणरत्न सदावर्ते हे मुंबई उच्च न्यायालयात वकील आहेत. ॲड. गुणरत्न सदावर्ते यांचे बारावीपर्यंतचे शिक्षण नांदेड शहरातच झाले आहे. त्यानंतर वैद्यकीय शिक्षणासाठी ॲड. गुणरत्न सदावर्ते औरंगाबादला गेले. वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी LLB साठी औरंगाबादमधील मिलिंद कॉलेजमध्ये प्रवेश घेतला.

LLB नंतर त्यांनी LLM चे देखील शिक्षण पूर्ण केलं. ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी राज्यघटना विषयावर पीएचडी केली आहे. त्यानंतर ॲड. गुणरत्न सदावर्ते यांचा ॲड. जयश्री पाटील यांच्याशी विवाह झाला. ॲड. जयश्री पाटील या देखील मुंबई उच्च न्यायालयात वकील आहेत. ॲड. जयश्री पाटील यांचे वडील लक्ष्मण पाटील स्वातंत्र्य सैनिक आहेत.

ॲड. गुणरत्न सदावर्ते आणि ॲड. जयश्री पाटील यांना दोन मुली आहेत. झेन आणि योणा अशी त्यांची नावे आहेत. ॲड. गुणरत्न सदावर्ते यांची मोठी मुलगी झेन सदावर्ते हीला बालशौर्य पुरस्कार देखील मिळाला आहे. २००२ सालापासून ॲड. गुणरत्न सदावर्ते मुंबई उच्च न्यायालयात वकिली करत आहेत. मराठा आरक्षणाविरोधात त्यांनी वकिली केली आहे.

महत्वाच्या बातम्या :-
फक्त चित्रपटात नाही, तर खऱ्या आयुष्यात पण हिरो आहे महेश बाबू, स्वत:च्या पैशांनी ३० मुलांवर केली हार्ट सर्जरी
जोरात टॉयलेटला आली म्हणून मैदानातून काढला पळ, ‘या’ खेळाडूमुळे थांबवावा लागला सामना, पहा व्हिडीओ
शेतकऱ्यांनो! आता वीज तोडली तरी घाबरायचं नाय, पठ्ठ्याने आणलाय भन्नाट जुगाड, ट्रॅक्टरपासून होतेय वीजनिर्मिती

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now