दुधात भेसळ आहे की नाही हे घरबसल्या ओळखू शकतात तुम्ही; काही मिनिटांतच कळेल भेसळयुक्त आहे की शुद्ध

आजकालच्या जमान्यात भेसळयुक्त पदार्थ रर्रास विकले जातात. पण सर्वात जास्त भेसळ ही दुधात केली जाते. कुठे केमिकल मिसळले जाते, तर कुठे पाणी. अशात काही लोकं तर दुधात डिटरर्जंट सुद्धा मिसळतात.

दुध ही अशी गोष्ट आहे जी घरात रोज वापरली जाते. त्यामुळे अशाप्रकारची भेसळ ही शरीरासाठी खुप धोकादायक ठरु शकते. पण आज आपण दुधात भेसळ आहे की नाही हे कसे ओळखायचे याबद्दल जाणून घेणार आहोत.

दुधात भेसळ आहे की नाही हे आपण दुधाचा वास घेऊनही माहित करु शकतो. जर दुधामधून साबणाचा गंध येत असेल तर समजून जावे की हे दूध सिंथेटीक आहे. कारण शुद्ध दुधामधून साबणाचा वास येत नाही. तसेच या दुधाचे काही थेंब एका वाटीत घ्यावे आणि त्यात थोडी हळद टाकावी, जर हळद लगेच घट्ट नाही झाली तर समजून घ्यावे या दुधात भेसळ आहे.

काही वेळा दुधात डिटर्जंट ही मिसळले जाते. ही भेसळ ओळखण्यासाठी थोडं दुध आणि पाणी घ्यावे आणि त्या दोघांना हलवावे. जर फेस आणि बुलबुले येत असेल तर समजून घ्यावे या दुधात डिटर्जंट मिक्स करण्यात आली आहे. दुधात जर डिटर्जंटची भेसळ असेल तर किडनी आणि लिवरवर त्याचा वाईट परीणाम होत असतो.

तसेच दुधामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी ही मिसळले जाते. हे ओळखण्यासाठीही एक सोपी पद्धत आहे. त्यासाठी सगळ्यात आधी दुधाचे काही थेंब एका लाकडावर टाका किंवा एखाद्या दगडावर. जेव्हा आपण असे काही करतो तेव्हा शुद्ध दुध एक पांढरी रेष सोडत जाते. पण भेसळ असलेले दुध काहीच निशाण सोडत नाही.

महत्वाच्या बातम्या-

पत्नीच्या मृत्यूनंतर हा बाप बाळाला कडेवर घेऊन शिकवतोय, जाणून घ्या ह्दयस्पर्शी कहाणी…
पांड्या बंधूंनी मुंबईत घेतले ३० कोटींचे घर; एकेकाळी मॅगी खाऊन दिवस काढत होते
धक्कादायक! पुण्यातील १७ वर्षीय तरुणीची आत्महत्या, दहावीला मिळाले होते ९५ टक्के

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.