बोबडी वळलीये, आवाज बंद होण्यास वेळ लागणार नाही; सोमय्यांना नाईक कुटुंबीयांनी खडसावले 

मुंबई | अन्वय नाईक यांच्या कुटुंबानं ठाकरे परिवाराशी आर्थिक व्यवहार केल्याचा दावा भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्यांनी केला असून अनेक गंभीर आरोप देखील त्यांनी लगावले आहे. यामुळे नवीन वादाला तोंड फुटले आहे. अशातच  सोमय्या यांनी केलेल्या आरोपांनी अन्वय नाईक यांच्या कुटुंबीयांनी उत्तर दिले आहे.

याबाबत ते एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होते. ‘अन्वय नाईक यांच्या आत्महत्येचा आणि या व्यवहारांचा काहीही संबंध नाही. हे गुन्हेगार अर्णव गोस्वामी यांना का पाठीशी घालत आहेत? ५ मे २०१८ला अन्वय नाईक यांच्या मृतदेहाला जेव्हा आम्ही अग्नि दिला, त्यावेळी किरीट सोमय्या यांची बोबडी वळली होती का? असा सवाल आज्ञा नाईक यांनी केला आहे.

तसेच ‘मला बऱ्याच लोकांकडून कळलं असून व्हिडीओदेखील पाहिला आहे. पण याच्यात गुपीत असे काहीच नाही. त्यांनी आमच्याकडून जागा विकत घेतली आणि आम्ही ती दिली. सोमय्या जे सातबारे दाखवत आहेत ती खुली कागदपत्रं असतात. महाभूमीच्या वेबसाईटवर गेलात तरी तुम्हाला ती मिळतील. त्यामुळे ही अशी खुली कागदपत्रं जाहीर केल्याबद्दल मी किरीट सोमय्यांचे आभार मानते,’ असा सनसनाटी टोला आज्ञा नाईक यांनी लगावला आहे.

दरम्यान, सोमय्या यांना राजकारण करायचं असेल तर ते काहीही मुद्दे आणू शकतात. पण हे आत्ता आणण्यामागचं काय प्रयोजन आहे हे मलाच विचारायचं आहे? गुन्हेगार अर्णब गोस्वामीला पाठीशी का घालताय?,” अशा शब्दात आज्ञा नाईक यांनी टीकास्त्र सोडले आहे.

‘सोमय्यांनी जमिनीच्या व्यवहाराशी त्याची तुलना करु नये. एक आई आणि तिचा मुलगा गेला आहे. त्याचा राजकारणाशी संबंध जोडू नका. बोबडी वळली आहे, आवाज बंद होण्यास वेळ लागणार नाही,” असा इशारा अक्षता नाईक यांनी दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या
टूथपेस्टवरील रंगीत पट्ट्यांचा अर्थ तुम्हाला माहीत आहे का? जाणून घ्या, अफवांना बळी पडू नका
भाजपकडून विजय साजरा होताच नितीशकुमार यांची कोरडी प्रतिक्रीया; म्हणाले..
अर्णबच्या सुटकेवर वेड्यासारखी नाचली कंगना; पहा व्हिडीओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.