पंड्या बंधूंचे कौतूकास्पद काम; देशातील ग्रामीण भागासाठी दिले तब्बल २०० ऑक्सिजन संच

मुंबई |  देशात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे देशात चिंतेच वातावरण पसरलं आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे लस, ऑक्सिजन, बेड यांचा मोठा तुटवडा जाणवू लागला आहे.

देशात ऑक्सिजन अभावी रुग्णांचा तडफडून मृत्यू होत आहे. देशावर आलेल्या संकटात मदतीसाठी नेते, अभिनेते, खेळाडू, उद्योजक पुढे सरसावले आहेत. देशातून  तर भारताला मदत  होत आहे. पण देशाबाहेरूनही भारताच्या मदतीला धावत आहेत.

अशातच भारतीय संघाचे खेळाडू आणि आयपीलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणारे हार्दिक पंड्या आणि कृणाल पंड्या  हे बंघू सुध्दा मागे राहिले नाहीत. ग्रामीण भागाला २०० ऑक्सिजन संचाची मदत करण्यासाठी पुढे आले आहेत.

काल मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स संघामध्ये अटीतटीचा सामना पार पडला. महाराष्ट्र दिनी मुंबई इंडियन्सने चेन्नईला पराभवाची धुळ चारली आहे. सामना सुरू होण्याआधी हार्दिक पंड्याने मदत करणार असल्याचं जाहीर केलं.

पंड्या म्हणाला, “सध्याचा काळ खुप कठीण आहे. देश  सध्या कोणत्या संकटातून जातोय याची पुर्णपणे आम्हाला जाणीव आहे.  देशातील फ्रंटलाईन वर्कर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना मी सॅल्यूट करतो. देशातील जो नागरीक एकमेकांना मदत करतोय. त्यांनाही माझा सॅल्यूट आहे”.

पुढे म्हणाला, “आपणही देशासाठी मदत करण्यास पुढं यावं यासाठी मी आणि कृणालसह कुटूंबियांनी देशातील ग्रामीण भागांमध्ये २००ऑक्सिजन संच उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या ज्या ठिकाणी मदत करण्याची गरज वाटेल. तिथं आम्ही नक्कीच मदत करू. असं मुंबई इंडियन्सचा खेळाडू हार्दिक पंड्या म्हणाला आहे”.

मुंबई इंडियन्सने आतापर्यंत पाच वेळा ट्राॅफी जिंकली आहे. मुंबई इंडियन्समधील अनेक खेळाडूंनी १४ व्या मोसमात चांगली कामगिरी केली आहे. मात्र पंड्या बंधूना चमक दाखवता आली नाही.

महत्वाच्या बातम्या-
पोलार्डच्या वादळात चेन्नई भूईसपाट; मुंबईच्या वाघाने चेन्नईच्या तोंडातील विजय खेचून आणला
पोलार्डच्या वादळात चेन्नईचा पालापाचोळा; २१९ धावांचा पाठलाग करत मुंबईकडून चेन्नईचा धुव्वा
काय सांगता! ऑक्सिजनसाठी पिंपळाच्या झाडाखाली झोपले रुग्ण, प्रकृतीही झाली स्थिर 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.