कौतुकास्पद! मराठमोळ्या सारिका काळेला अर्जुन पुरस्कार जाहीर

भारतीय महिला खो-खो संघाची कर्णधार सारिका काळे हिला क्रीडा क्षेत्रातील अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार मिळवणारी मराठवाड्यातील पहिलीच महिला क्रीडापटू ती ठरली आहे.

वयाच्या अकराव्या वर्षापासून क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी तिने केली आहे. सारिका काळे हिने अनेक राज्य, राष्ट्रीय स्पर्धांमध्ये संघाला सतत विजय मिळवून दिला आहे.

तिला अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्याने जिल्ह्यात आंनदाचे वातावरण आहे.
वयाच्या अकराव्या वर्षी सारिकाने क्रीडाक्षेत्रात पाऊल टाकले. शालेय स्तरावरील खो-खो स्पर्धेतील तिचे थक्क करणारे क्रीडाकौशल्य कौतुकास्पद होते.

२००६-०७ मध्ये तिची महाराष्ट्र संघात निवड झाली. २०१०-११ मध्ये महाराष्ट्र संघाच्या कर्णधारपदी तिची निवड झाली. छत्तीसगढमध्ये झालेल्या स्पर्धांमध्येही तिने सुवर्णपदक मिळवले.

नंतर तीन राष्ट्रीय स्पर्धांमध्ये तिने कर्णधारपद भूषविले. २०१५-१६ मध्ये तिची भारतीय संघात निवड झाली. तिच्या नेतृत्वाखाली भारतास सुवर्णपदक मिळाले.

२०१६ मध्ये आसाम गुवाहाटी येथील खो-खो स्पर्धेसाठी कर्णधारपदी निवड व तेथेही तिने सुवर्णपदक असा तिचा प्रवास झाला. राज्य शासनाच्या शिवछत्रपती राज्यस्तरीय पुरस्कारासह अन्य पुरस्कारानेही तिचा सन्मान करण्यात आला आहे.

आता दिल्लीत तिचा सन्मान करण्यात येणार आहे. यामुळे महाराष्ट्रासाठी आणि उस्मानाबादसाठी ही अभिमानाची बाब आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.