‘या’ गंभीर आजाराचा सामना करत आहे राणी मुखर्जीचा नवरा आदित्य चोप्रा; ऐकून धक्का बसेल

बॉलीवूडमध्ये काम करणारा कोणताही व्यक्ति मिडीयाच्या कॅमेऱ्यापासून लांब राहू शकत नाही. मग तो दिग्दर्शक असो किंवा अभिनेता त्यांना नेहमीच मिडीयाच्या कॅमेऱ्यापासून दुर राहूच शकत नाही. पण फिल्म इंडस्ट्रीमध्ये असा एक दिग्दर्शक आहे जो नेहमी कॅमेऱ्यांपास दुर राहतो.

या दिग्दर्शकाचे नाव आहे आदित्य चोप्रा. आदित्य चोप्रा इंडस्ट्रीतील सर्वात यशस्वी दिग्दर्शकांपैकी एक आहे. आजपर्यंत त्याने अनेक हिट चित्रपटांचे दिग्दर्शन केले असले तरी मिडीयाच्या कॅमेऱ्यापासून तो नेहमीच दुर पळतो. एवढ्या वर्षांनंतर या मागचे कारण लोकांसमोर आले आहे. जाणून घेऊया ते कारण काय आहे.

आदित्यचा जन्म २१ मे १९७१ ला मुंबईत झाला होता. आदित्य ५० वर्षांचे झाले आहेत आणि त्यांना फिल्म इंडस्ट्रीमध्ये ३० वर्ष पुर्ण झाली आहेत. खुप कमी वयातच आदित्यने बॉलीवूडमध्ये काम करायला सुरुवात केली होती. आजच्या घडीला ते इंडस्ट्रीतील आयकॉनीक डायरेक्टर आहेत.

आदित्य दिग्दर्शक यश चोप्राचा मोठा मुलगा आहे. कमी वयातच त्यांनी इंडस्ट्रीमध्ये वडीलांसोबत काम करायला सुरुवात केली होती. त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये एकापेक्षा एक यशस्वी चित्रपट दिले आहेत. त्यासोबतच त्यांनी नेहमी काही तरी वेगळ्या विषयावर चित्रपट केले आहेत.

आदित्यने २३ व्या वर्षी ‘दिववाले दुल्हनिया ले जायेंगे’ चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. त्यानंतर त्यांनी यशस्वी चित्रपटांची यादीत तयार केली. अनेक हिट चित्रपट देणारे आदित्य चोप्रा नेहमी मिडीयाच्या कॅमेऱ्यापासून दुर राहतात. त्यामागे एक कारण आहे.

आदित्य चोप्रा एका गंभीर आजाराचा सामना करत आहेत. ज्यामूळे त्यांना कॅमेऱ्यापासून दुर राहावे लागते. रिपोर्टसनुसार आदित्य एंटी सोशल पर्सनिलिटी आजाराचा सामना करत आहेत. त्यामूळे ते जास्त गर्दीच्या ठिकाणी जाऊ शकत नाहीत. त्यामूळे ते मिडीयाच्या कॅमेऱ्यापासून दुर पळत असतात. त्यांना कॅमेऱ्यासमोर जाण्याची हिम्मत होत नाही.

आदित्यच्या पर्सनल आयूष्याबद्दल बोलायचे झाले तर त्यांनी अभिनेत्री राणी मुखर्जीसोबत लग्न केले आहे. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर २०१४ मध्ये दोघांनी लग्न केले. प्रेम ते लग्न हा प्रवास त्यांच्यासाठी सोपा नव्हता. त्यांना या रस्त्यामध्ये अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता.

ज्या वेळी आदित्य चोप्रा राणी मुखर्जीसोबत रिलेशनशिपमध्ये होते. त्यावेळी ते विवाहीत होते. त्यांचे लग्न पायल चोप्रासोबत झाले होते. पण राणीच्या प्रेमात पागल झालेल्या आदित्येने पायलला सोडण्याचा निर्णय घेतला होता. वडील यश चोप्राला मात्र ही गोष्ट मान्य नव्हती.

यश चोप्रा राणी आणि आदित्यच्या नात्याच्या विरोधात होते. पण आदित्यने हार मानली नाही. त्यांनी राणीसोबत लग्न करण्यासाठी घर सोडले होते. शेवटी मुलाच्या हट्टासमोर यश चोप्रा हारले आणि त्यांनी लग्नाला होकार दिला. २०१४ मध्ये दोघांनी इटलीमध्ये लग्न केले. आत्ता दोघे एका मुलीची आई वडील आहेत.

महत्वाच्या बातम्या –
मालिकेसोबत नायरा खऱ्या आयूष्यात देखील आहे करोडोंच्या संपत्तीची मालकिण
नाबालिक मुलीसोबत लग्न करत होता साऊथचा ‘हा’ सुपरस्टार; पोलीसांनी थांबवले लग्न
सैराटमधील प्रदीप आठवतोय? सध्या काय करतोय बघून आश्चर्यचकीत व्हाल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.