गडकिल्ले संवर्धनासाठी ठाकरे सरकारने तिजोरी उघडली; शिवनेरीसाठी दिला कोट्यावधींचा निधी

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील गडकिल्ल्यांच्या पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टीने पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी एक मोठा आणि महत्वपुर्ण निर्णय घेतला आहे. ज्याचे स्वागत महाराष्ट्रभरात होत आहे. शिवजन्मभुमी शिवनेरी किल्ल्याचे संवर्धन, सुशोभिकरण आणि पर्यटनदृष्ट्या विकास करण्यासाठी २३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

शिवनेरी किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व जपत त्याचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यासाठी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी मोठा निर्णय घेतला असून त्याला प्रशासकीय मान्यताही देण्यात आली आहे. याबाबत आदित्य ठाकरे म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी आहे. त्यामुळे त्यांच्याशी संबंधित गडकिल्ल्यांचे जतन, संवर्धन आणि त्यांचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने पुढाकार घेतला आहे.”

तसेच “याचाच एक भाग म्हणून शिवरायांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी गडकिल्ल्याचे जतन, संवर्धन, सुशोभिकरण आणि या परिसराचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यात येणार आहे. यासाठी २३ कोटी रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे.” असेही त्यांनी स्पष्ट केले.

“या निधीतून शिवनेरी किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व जपत त्याचा पर्यटनदृष्ट्या विकास केला जाईल” असे त्यांनी सांगितले. यामध्ये अंबरखाना, राजवाडा आणि त्याला जोडून असलेल्या भागाचे पुनरुज्जीवन, पाथवेंची सुधारणा, रॉककट गुंफांचे पुनरुज्जीवन, पर्यटकांसाठी सोयी-सुविधा, दिशादर्शक आणि मार्गदर्शक चिन्हे, बागकाम ही कामे करण्यात येणार आहेत.

सोबतच शिवनेरी प्रदक्षिणा मार्गाची सुधारणा, वरसुबाई मंदिर ते पद्मावती मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची सुधारणा, शिरोली बु. ते तेजेवाडी रस्त्याची सुधारणा आदी विविध रस्त्यांची सुधारणा करणे, शिवसंकुल येथे इको टुरीजमची कामे, अप्पर पाथवेसाठी गॅबियन वॉल, बागेसाठी लँडस्केपींगची ही कामे देखील करण्याचा निर्णय आदित्य ठाकरे यांनी घेतला आहे.

फक्त ‘या’ एकमेव कंपनीला आहे भारताचा तिरंगा झेंडा तयार करण्याचा अधिकार; जाणून घ्या…

स्टेट बॅंकेची भन्नाट योजना; एफडी करा व दुप्पट पैसे मिळवा

‘हा पुरस्कार माझी झोळी भरणाऱ्यांचा, माझ्या लेकरांचा, मग उरलासुरला माझा’

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.