Share

राज्यपालांनी असं निघून जाणे, भाषणावेळी त्यांचा अपमान होणे हे अयोग्य, आदित्य ठाकरेंनी व्यक्त केली खंत

Aditya-Thkare

आजपासून महाराष्ट्र राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरवात झाली आहे. अधिवेशनाच्या सुरवातीला राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे अभिभाषण सुरु झाले. त्यावेळी सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी एक विधान केलं होतं.(Aditya thakare statement on rajypaal bhagat singh koshyari)

याचा निषेध म्हणून महाविकास आघाडीच्या आमदारांनी सभागृहात घोषणाबाजी केली. या घोषणाबाजीमुळे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आपले भाषण दोन मिनिटातचं आटोपते घेतले. यावर राज्याचे पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हा महाराष्ट्राचा अपमान आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे या प्रकरणावर खंत व्यक्त करताना म्हणाले की, “ही लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे. हा महाराष्ट्राचा अपमान झाला आहे. राज्यपालांनी असं निघून जाणे, त्यांच्या भाषणावेळी त्यांचा अपमान होणे हे सर्व अयोग्य आहे. आम्हाला या गोष्टींमुळे धक्का बसला आहे”, असे आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

राज्यपालांनी अभिभाषणाच्या प्रथेला फाटा देत थेट विधिमंडळ सोडून सभागृहातून काढता पाय घेतला. राज्यपाल राष्ट्रगीतालाही थांबले नाहीत, अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे. आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाला जोरदार सुरवात झाली. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या भाषणाने या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाला सुरवात करण्यात येत होती.

यावेळी सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या विधानाचा निषेध केला. तसेच सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. या घोषणाबाजीमुळे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आपले भाषण दोन मिनिटांमध्येच संपवले आणि सभागृहातून बाहेर निघून गेले.

काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वक्तव्य केलं होतं. “चाणक्याशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल, समर्थांशिवाय छत्रपती शिवाजींना कोण विचारेल?शिवाजी आणि चंद्रगुप्त यांना लहान दाखवत नाही. प्रत्येकाच्या मागे आईचे मोठे योगदान असते, तसेच आपल्या समाजात गुरुचं मोठं स्थान असतं. शिवाजी महाराजांनी समर्थांना म्हंटल की तुमच्या कृपेने मला राज्य मिळालं आहे”, असे राज्यपाल एका कार्यक्रमात म्हणाले होते.

महत्वाच्या बातम्या :-
पुण्यातील विवाहित महिला २० वर्षाच्या मुलासाठी पतीला सोडून गेली पळून; ऑनलाईन सुरु झाली होती लव्हस्टोरी
पाकिस्तानी विद्यार्थ्यांनी घेतला भारताच्या तिरंग्याचा आधार, पडले युक्रेनमधून बाहेर; वाचा नक्की काय घडलं
Russia Ukraine War: आतापर्यंत रशियाच्या किती सैनिकांचा मृत्यु झाला? पहिल्यांदाच समोर आली आकडेवारी

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now