Aditya Thackeray : एकनाथ शिंदेंनी ४० आमदारांना सोबत घेऊन शिवसेनेशी बंडखोरी केली. त्यानंतर शिवसेनेला लागलेली गळती अजूनही थांबलेली नाही. दुसरीकडे, अनेक नेते, कार्यकर्ते शिंदेगटात प्रवेश करताना दिसत आहेत.
त्यामुळे पक्षबांधणीसाठी शिवसेनेचे प्रयत्न सुरु झाले आहेत. त्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे राज्यभरात विविध ठिकाणी दौरे करत आहेत. यादरम्यान ते अनेक सभा घेऊन लोकांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहेत.
मात्र, त्यानंतरही शिवसेनेची गळती सुरूच आहे. यातच युवासेनेचे राज्य विस्तारक अजिंक्य चुंबळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी वरून सरदेसाई यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांचा हा राजीनामा शिवसेनेसाठी मोठा धक्का समजला जात आहे.
अजिंक्य चुंबळे यांना वरून सरदेसाई यांचे अत्यंत जवळचे म्हणून ओळखले जात होते. परंतु, त्यांनी आज वरून सरदेसाई यांच्याकडेच आपला राजीनामा सोपवला आहे. यासोबतच अजिंक्य चुंबळे यांचे वडील शिवाजी चुंबळे आणि आई कल्पना चुंबळे हे सुद्धा शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करायच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे.
त्यामुळे शिवसेनेतील ही गळती कधी थांबणार?, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच काही दिवसांपूर्वीच आदित्य ठाकरेंचा महाराष्ट्र दौरा पार पडला. त्यांनी शिंदे गटातील बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात सभा घेतल्या. त्यावेळी त्यांनी शिंदे गटातील बंडखोर आमदारांवर प्रचंड टीकाही केल्या.
दिवसेंदिवस शिवसेनेच्या अडचणी वाढतच आहे. पक्षाचे होणारे हे नुकसान टाळण्यासाठी उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे आटोकाट प्रयत्न करत आहेत. उद्धव ठाकरे राज्यभरात दौरा करणार आहेत. या दौऱ्याची सुरुवात ते एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे येथून करणार आहेत.
महत्वाच्या बातम्या
बंजारा समाजाच्या नेत्यांनी घेतली ठाकरेंची भेट; संजय राठोडांना पाडण्यासाठी बंजारा समाज एकवटला
‘या’ कारणावरून शिवसेनेत धूमशान, आणखी एक आमदार सोडणार उद्धव ठाकरेंची साथ?
हे अति झालं! भाजपच्या महिला नेत्याने गाठला क्रूरतेचा कळस; मोलकरणीला घरात डांबून दात तोडले, अन्…
संजय राठोडांना धडा शिकवण्यासाठी स्वतः उद्धव ठाकरे रणांगणात; बंजारा समाजाच्या नेत्यांसोबत आखली खास रणनिती