कोरोनाच्या काळात परीक्षेवरुन वाद; आदित्य ठाकरेंचे पंतप्रधान मोदींना पत्र

मुंबई |  देशात कोरोना व्हायरसचा धोका कायम असताना प्रवेश परीक्षेंच्या तारखा जाहीर करण्यात आल्याने जोरदार विरोध होत आहे. भाजपशिवाय इतर राजकीय पक्षांचा या परीक्षांना विरोध आहे. तसंच विद्यार्थी आणि पालकांमध्येही कोरोना काळात परीक्षा घेण्याबाबत नकारात्मक सूर आहे. अशातच आता युवासेनेचे प्रमुख आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहले आहे.

आदित्य ठाकरे यांनी मोदींना लिहलेल्या पत्रामध्ये या परीक्षा रद्द करण्यासाठी आपण लक्ष घालावे, अशी मागणी केली आहे.

विविध पदवी आणि प्रवेश परीक्षांमुळे विद्यार्थी आणि पालकांना धोका निर्माण होऊ शकतो. याबाबत लक्ष वेधण्यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे, अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरून दिली आहे.

बहुतेक राज्यांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना परीक्षा घेणे हा पर्याय योग्य नाही. अनेक विद्यार्थी हे त्यांच्या पालकांसोबत, आजी-आजोबांसोबत राहात असतात. त्यामुळे त्यांच्याही जीवाला धोका निर्माण होऊ शकते, असं आदित्य ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

-‘ती’ आजही जिवंत असून तिने दुसरे लग्न केले आहे

-“माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना भाजपकडून मुख्यमंत्री पदाचे तिकीट मिळणार”

-गांधी परिवारातील नाही तर महाराष्ट्रातील नेता होणार काँग्रेसचा नवा अध्यक्ष? ‘ही’ नावे आहेत चर्चेत

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.