Share

Aditya Thackeray: आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना कात्रीत पकडत थेट मर्मावरच बोटं ठेवलं; मुंबई महापालिकेच्या मुद्द्यावर…

Aditya Thackeray

आदित्य ठाकरे (Aditya Thackeray): शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांना सोबत घेऊन शिवसेनेशी बंडखोरी केली. त्यामुळे शिवसेनेत फूट पडली व ठाकरे आणि शिंदे असे दोन गट निर्माण झाले. या फुटीमुळे दोन्ही गटातील नेते राज्यभरातील आमदार गोळा करण्यासाठी चांगलेच सक्रिय झाले आहेत. यातच शिवसेनेचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेही जोरदार तयारीला लागले आहेत.

राज्यभरात आदित्य ठाकरेंचा दौरा सुरु आहे. या दौऱ्यात थेट रस्त्यावर उतरून ते बंडखोरांचा निषेध करत आहेत. त्यांनी राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये सभा घेतली. आता ते मुंबईत परतले आहेत. आदित्य ठाकरेंनी मुंबईत परतल्याबरोबर शिवसेनेच्या विविध शाखांना भेट देण्यास सुरुवात केली आहे.

मुंबईतील विभागवार शिवसेना शाखांचा आढावा घेण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी गुरुवारपासून सुरुवात केली आहे. भायखळा, वरळी आणि प्रभादेवी येथील काही शाखांमध्ये त्यांनी पहिल्या दिवशी भेटी दिल्या. तसेच शाखाप्रमुख, विभागप्रमुख व पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेत तेथील स्थानिक राजकीय स्थितीचा आढावादेखील त्यांनी घेतला. मुंबईमधील इतर शिवसेना शाखांमध्येही ते आता नियमित भेटी देणार असल्याचे बोलले जात आहे.

“हे सरकार निवडणुकीला घाबरत आहे. ज्या नगरविकास मंत्र्यांनी नवीन वार्ड रचना जाहीर केली होती, त्याच नगरविकास मंत्र्यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर ती वार्ड रचना रद्द केली. त्यामुळे हे सरकार निवडणुकीला घाबरत असल्याचं स्पष्ट झालं आहे,” असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे. हे सरकार कोसळणार आहे, असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूका जवळ आल्या आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. यातच आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केलं. “आपण केलेली कामं घराघरापर्यंत पोहोचवा. केलेल्या कामाची माहिती द्या. हे सरकार बेकायदेशीर आहे. ते पडणारच आहे. त्यामुळे आपण केलेल्या कामाची माहिती देऊन मतदार राजाला जागृत करा,” असे आदित्य ठाकरे शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना म्हणाले.

महत्वाच्या बातम्या
Shivsena: शिवसेनेची ‘ती’ मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळत दिला मोठा धक्का, शिंदे गटाचा मार्ग झाला सोपा
Uddhav Thackeray: बंडखोर आमदाराच्या बहिणीने उद्धव ठाकरेंना दिली हजारो शपथपत्र; म्हणाल्या, ठाकरे कुटुंबावर…
Pune: पुण्यातीस एसटी चालकाने स्वतः मृत्यूला कवटाळले पण गाडीतील २५ प्रवाशांचे प्राण वाचवले
मराठी लोकं साऊथचे सिनेमे पाहायला सिनेमागृहात जातात पण मराठी चित्रपट का पाहत नाहीत? महेश मांजरेकरांचा सवाल

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now