Aditya Thackeray : आदित्य ठाकरे यांनी पुणे येथे पत्रकार परिषद घेतली, यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका केली. तीन महिन्यांमध्ये आपल्या मुख्यमंत्र्यांनी काहीच केले नाही असे म्हणत त्यांनी निशाणा साधला. यावरून आता नवा वाद निर्माण होणार असल्याचे बोलले जात आहे.
यावेळी आदित्य ठाकरे यांनी पुणे महानगरपालिका आयुक्तांची भेटही घेतली. यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, आपले मुख्यमंत्री मंडळं, दहीहंडी, राजकीय भेटी आणि फोडाफोडी हे सोडून कुठल्याही दुसऱ्या राज्यात गेले नाहीत, असे ते म्हणाले.
जसे शिवराज सिंह चव्हाण, नवीन पटनाईक आपल्या राज्यात आले, तसे आपले मुख्यमंत्री दुसऱ्या राज्यात गेले नाहीत. गेल्या तीन महिन्यांमध्ये आपल्या मुख्यमंत्र्यांनी असं काहीही केलेलं नाही, असेही ते म्हणाले. तसेच उद्योजकांना या सरकारवर विश्वास नाही, असेही ते म्हणाले आहेत.
पुढे ते म्हणाले की, कृषिमंत्री कोण आहेत हे जेव्हा मी शेतकऱ्यांना विचारलं तर त्या बिचाऱ्यांना ते माहितीही नव्हतं. कारण अजून बांधावर कोणीच आलेलं नाही. तसेच उद्योजकांना उद्योगमंत्री कोण आहेत हे माहिती नाही. अशा परिस्थितीत महाराष्ट्र नेमका कुठे चाललाय हा महत्वाचा प्रश्न आहे, असेही ते म्हणाले.
तसेच या सरकारवर कोणालाच विश्वास नाही, असेही वक्तव्य आदित्य ठाकरेंनी केले आहे. जो माणूस निवडणुकीला सामोरे जायला तयार नाही तो गुंतवणूक काय आणू शकतो असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला.
तसेच त्यांनी यावेळी पुण्यातील अनेक समस्यांनवर चर्चा केली. वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पानंतर आता एअरबस महाराष्ट्राबाहेर गेल्याने राज्यात नव्या वादाला तोंड फुटले आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांच्या एकमेकांवर टीकाटिपण्णी सुरु आहेत.
महत्वाच्या बातम्या
Chandrakant Patil : अजित पवार अन् मुख्यमंत्री…; चंद्रकांत पाटलांनी उडवली रोहित पवारांची खिल्ली
shivsena : “शिवसेनेत फक्त करा कष्ट अन् खावा उष्ट”; ठाकरेंवर टीका करत बड्या नेत्याने ठोकला पक्षाला रामराम
‘एअरबस’ प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्यानंतर सामंत म्हणतात की, यापेक्षा मोठा प्रकल्प महाराष्ट्रात आणू
bacchu kadu : बच्चू कडू ठाकरे गटात प्रवेश करणार? राज्य सरकारला दिला घरचा आहेर, तर उद्धव ठाकरेंचे केले समर्थन, कडू यांच्या मनात नेमकं काय?