बॉलिवूड लोकप्रिय गायक आदित्य नारायण हा श्वेता अग्रवालसोबत लग्नबंधनात अडकला आहे. आदित्य आणि श्वेता याचा लग्न समारंभ १ डिसेंबर पार पडला. जवळच्या लोकांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडला.
कोरोनामुळे रिसेप्शन पार्टीमध्ये देखील केवळ ५० पाहुणे आले होते. आदित्य आणि श्वेताच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. रिसेप्शन पार्टीत गोविंदा पासून भारती सिंहपर्यंत अनेक जण डान्स आणि मस्ती करताना दिसले होते.
सध्या मात्र या जोडीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये आदित्य आपल्या पत्नीला श्वेताला माहेरी पाठवण्याची धमकी देताना दिसत आहेत. आदित्य श्वेताला असे म्हणताना दिसत आहे की, ‘चवीत काही गडबड व्हायला नाही पाहिजे, नाहीतर तुला माहेरी पाठवणे. मात्र त्याच्याकडून एक चूक होते.
आदित्य या व्हिडिओ चुकून माहेरी बोलायच सोडून सासरी पाठवणे म्हणतो. पण नंतर तो आपली चुक सुधारतो. त्यामुळे त्याच्यावर सगळेजण हसताना दिसत आहे. त्याची पत्नीच त्याला ही चूक लक्षात आणून देते.
आदित्यने स्वतः हा व्हिडिओ शूट केला आहे. आता हे दोघे शिमला, सुला वाइनयार्ड्स, गुलमर्गला हनिमूनसाठी जाणार आहेत. गेली १० वर्ष ते रिलेशनशिपमध्ये असल्याचे सांगितले जात आहे.