…शेवटी आदित्य पंचोलीच्या धमक्यांना कंटाळून बोनी कपूरने पोलीस स्टेशनमध्ये केली होती तक्रार

फिल्म इंडस्ट्रीमध्ये अनेक वेळा कलाकारांमध्ये अनेक गोष्टींवरून वाद होत असतात. दोन अभिनेत्यांमध्ये भांडण होणे यात काही नवीन नाही. पण जर भांडण खुप जास्त वाढलं आणि कलाकार एकमेकांना जीवे मारण्याची धमकी देत असतील. तर मग मात्र या भांडणांमध्ये पोलिसांना प्रवेश करावा लागतो.

असे भांडण बोनी कपूर आणि आदित्य पंचोलीमध्ये झाले होते. या दोघांच्या भांडणामूळे फिल्म इंडस्ट्रीमध्ये एका नवीन वादाची सुरुवात झाली होती. शेवटी पोलिसांनी या दोघांच्या भांडणामध्ये प्रवेश केला आणि वाद मिटले.

ही गोष्ट आहे ९० च्या दशकाच्या सुरुवातीची. त्यावेळी बॉलीवूडमध्ये अनेक नवीन चेहरे प्रवेश करत होते. आदित्य पंचोलीने देखील बॉलीवूडमध्ये डेब्यु केला होता. आदित्य त्याच्या करिअरवर लक्ष देत होता. तो चांगल्या चित्रपटांची वाट पाहत होता. स्क्रिप्ट चांगली असेल तर तो चित्रपट साइन करत होता.

याच कालावधीमध्ये आदित्य पंचोलीने एक चित्रपट साइन केला होता. त्या चित्रपटाची सगळी तयारी झाली होती. पण शुटिंग सुरू होण्याच्या काही दिवसांपूर्वी आदित्यला त्या चित्रपटातून काढून टाकण्यात आले. त्याच्या जागी अनिल कपूरला चित्रपटात घेण्यात आले.

कारण अनिल कपूरचे करिअर खराब होत होते. ‘मिस्टर इंडिया’ चित्रपटानंतर अनिल कपूरचे सगळे चित्रपट फ्लॉप झाले होते. या गोष्टीमूळे तो फ्लॉप हिरो समजला जाऊ लागला होता. ही गोष्ट अनिल कपूरचा बाऊ बोनी कपूरला मान्य नव्हती.

म्हणून बोनी कपूरने अनिलला चांगला चित्रपट द्यायचा असे ठरवले होते. त्यावेळी त्यांना समजले की, एन चंद्रा एक दमदार चित्रपट बनवत आहेत. म्हणून बोनी कपूर एन चंद्राला भेटले आणि त्यांनी आदित्यच्या जागी अनिलला चित्रपटामध्ये घेण्याची विनंती केली.

एन चंद्राने या गोष्टीला नकार दिला. कारण चित्रपटाची सगळी कास्ट ठरवण्यात आली होती. सगळी तयारी झाली होती. काही दिवसांनी शुटिंग सुरू होणार होते. पण बोनी कपूरने त्यांचा हट्ट सोडला नाही. ते रोज त्यांना फोन करून अनिलला चित्रपटात घेण्याची विनंती करत.

शेवटी एन चंद्राने बोनी कपूरचे ऐकले आणि आदित्य पंचोलीला या चित्रपटातून काढून टाकले. त्याच्यात जागी अनिल कपूरला घेतले. हा चित्रपट ‘तेजाब’. तेजाब चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाला होता. या चित्रपटाने अनिल कपूरचे करिअर सुरळीत केले होते.

आदित्यला या चित्रपटातून काढून टाकण्यात आले होते. म्हणून त्याला खुप जास्त राग आला होता. पण तो गप बसला. कारण तो फिल्म इंडस्ट्रीमध्ये नवीन होता. कोणालाही ओळख नव्हता. म्हणून त्याला वाद घालायचे नव्हते.

काही वर्षांनंतर ‘त्रिमूर्ती’ चित्रपटा वेळी देखील बोनी कपूरने असेच काही काहीतरी केले. दिग्दर्शकांनी या चित्रपटासाठी आदित्य पंचोलीला साइन केले होते. पण बोनी कपूरने परत एकदा अनिल कपूरला या चित्रपटात स्थान मिळवून दिले.

या वेळेस मात्र आदित्य पंचली गप बसला नाही. त्याला बोनी कपूरचा खुप जास्त राग आला होता. म्हणून त्याने बोनी कपूरला फोन केला आणि शिव्या द्यायला सुरुवात केली. सुरुवातीला बोनी कपूरने या गोष्टीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले.

पण ही गोष्ट वाढत गेली. आदित्य पंचोली रोज रात्री दारू पिऊन बोनी कपूरला फोन करत आणि करिअर खराब केले. असे बोलत. एक दिवशी तर आदित्य पंचोलीने बोनी कपूरला जीवे मारण्याची धमकी दिली. ही गोष्ट मात्र बोनी कपूरला आवडली नाही.

बोनी कपूरने आदित्य पंचोली विरोधात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला. असे बोलले जाते की, ज्यावेळी पोलीस स्टेशनमध्ये बोनी कपूर आणि आदित्य पंचोली समोरासमोर आले. त्यावेळी आदित्यने बोनीच्या कानाखाली वाजवली होती. पण पोलिसांनी हे प्रकरण सांभाळून घेतले.

काही दिवसांनी हा वाद संपला. पण आजही आदित्य पंचोली बोनी कपूरशी बोलत नाही. बोनी कपूरने मला चांगल्या चित्रपटांमधून काढले आणि त्यामुळेच माझे करिअर खराब झाले. असे आदित्य पंचोलीचे म्हणणे आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

बॉलीवूडच्या ‘या’ खानमूळे दिव्या भारती रडत होती

‘परदेस’ चित्रपटात शाहरुख खानसोबत काम करण्याऱ्या अभिनेत्री आज ‘अशी’ दिसते

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मधील छोटी सोनू आज झाली आहे मोठी; दिसते अतिशय ग्लॅमरस

दिलीप कुमारमूळे गोविंदा २५ चित्रपट गमवावे लागले होते; कारण ऐकून तर विश्वास नाही बसणार

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.