बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक उदित नारायण यांचा मुलगा आदित्य नारायण आपली जूनी मैत्रीण आणि प्रेमिका श्वेता अग्रवालसोबत विवाहबंधनात अडकलेला आहे. मंगळवारी आदित्य नारायणने श्वेताशी मुंबईतील इस्कॉन मंदिरात अगदी सोप्या पद्धतीने लग्न केले. लग्नात फक्त कुटुंबातील सदस्य आणि अतिशय खास मित्र उपस्थित होते.
कोरोनामुळे लग्न कमी लोकांच्या उपस्थितीत इस्कॉन मंदिरात हा समारंभ पार पडला. दरम्यान, आदित्य नारायणचे वडील उदित नारायण खूप खुश दिसत होते. उदित नारायण मिरवणुकीत नाचतानाही दिसले. हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. तसेच आदित्य आणि श्वेता यांचे फोटोही खुपच व्हायरल होत आहेत.
आदित्यची पत्नी श्वेता अग्रवाल एक अभिनेत्री आहे. श्वेताने करिअरची सुरुवात टीव्हीवर केली. ती बाबुल की दुआँ, शगुन आणि देख मगर प्यार से सारख्या टीव्ही शोमध्ये दिसली होती.
याशिवाय ती ‘शपित’ या चित्रपटात आदित्य नारायणसोबत दिसली होती. शापित हा मुख्य अभिनेता म्हणून आदित्य नारायणचा पहिला चित्रपट होता. तिथेच त्यांची मैत्री झाली होती.
बऱ्याच दिवसांपासून या लग्नाची चर्चा सुरू होती. स्वतः आदित्यनेही लग्नाशी संबंधीत कार्यक्रमांचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. आणि हे फोटो तुफान व्हायरल होत आहेत.