कधी एअरपोर्टवर काढली पँट तर कधी तरुणीचा खाला मार; ‘या’ घटनांमुळे सतत वादात आदित्य नारायण

‘इंडियन आयडल १२’सोबतच होस्ट आदित्य नारायणसाठीही हे दिवस चांगले नाहीत.  एखादा वाद संपत नाही की नवीन युद्ध सुरू होतो. या शो-सोबतच या शोचा होस्ट,सूत्रसंचालक आदित्य नारायणदेखील चर्चेत आहे. तसे पाहायला गेले तर तो कायमच चर्चेत असतो आणि तेही वेगवेगळ्या वादांमुळे.

२०१७ मध्ये आदित्य नारायणने जेव्हा रायपूर विमानतळ कर्मचार्‍यांना सामान उतरवण्याची धमकी दिली तेव्हा तो चर्चेत आला. प्रकरण सुरु झाले की आदित्यच्या सामानाचे वजन निर्धारित मर्यादेपेक्षा ४० किलो जास्त होते. त्या बदल्यात कर्मचार्‍यांनी त्यांना १३००० रुपये देण्यास सांगितले.

आदित्यने सांगितले की मी १० हजार रुपयांपेक्षा जास्त पैसे देणार नाही. यावर वादविवाद झाला आणि त्याने कर्मचार्‍यांशी गैरवर्तन केले. एवढंच नव्हे, तर आदित्यने त्या कर्मचाऱ्याला चड्डी उतरवण्याची धमकीही दिली होती. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

२०१८ मध्ये आदित्य नारायण यांना वर्सोवा पोलिसांनी वेगाने वाहन चालविताना ऑटो रिक्षाला धडक दिल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. रिक्षात बसलेल्या एका महिला प्रवाशाने आदित्यविरोधात तक्रार दाखल केली. मात्र, या प्रकरणात आदित्य घटनास्थळावरून पळून गेला नाही तर महिला व रिक्षाचालकास रुग्णालयात घेऊन गेला होता.

२०११ मध्ये आदित्य नारायण मोठ्या वादात अडकला होता. तो आपल्या मित्रांसह पबमध्ये होता आणि त्याने एका मद्यधुंद मुलीशी वाद घालत काहीतरी सांगितले होते. त्यावर चिडून मुलीने आदित्यला थप्पड मारली होती. आदित्यने मी मित्रांसोबत पबमध्ये गेलो होता तिथे वादही झाले होते असे कबूल केले मात्र या वादात कोणीही मुलगी नव्हती. त्यामुळे मुलीने थप्पड मारण्याचा प्रश्नच नव्हता,’असं स्पष्टीकरण आदित्यने दिलं होतं.

इंडियन आयडल ११ दरम्यान आदित्य नारायणने नेहासोबत लग्न आणि प्रेमाचे नाटक केले. तो शोच्या स्टेजवरच नेहाशी लग्न करणार असल्याची बातमी पसरली. यानंतर चाहते खूप उत्साही झाले. तथापि, नंतर हे स्पष्ट झाले की हे सर्व फक्त टीआरपी केल होते.

इंडियन आयडल १२ च्या मंचावर आदित्य नारायण यांनी किशोर कुमार स्पेशल गाण्याच्या सप्ताहात देखील अमित कुमार यांच्या बोलण्यावर टिपण्या केल्या. अमित कुमार यांनी किशोर कुमार स्पेशल एपिसोडनंतर सांगितले की त्याने पैसे घेतले आणि निर्मात्यांच्या सांगण्यावरून स्पर्धकांचे कौतुक केले. अमित कुमारांच्या या वक्तव्याची फोड म्हणून काही भागानंतर आदित्य नारायण यांनी अतिथी सानू, रूपकुमार राठोड आणि अनुराधा पौडवाल यांना शोमध्ये  विचारले की तुम्ही स्पर्धकांचे मनापासून कौतुक केले आहे की आमच्या टीमला असे करण्यास सांगितले आहे का? यावर लोकांनी त्याला जोरदार ट्रोल केले.

इंडियन आयडल १२ च्या नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये सवाई भटशी बोलताना आदित्य नारायण यांनी अलिबाग शहरावर भाष्य केले ज्यावर मनसेने तीव्र विरोध दर्शविला आणि आदित्यला माफी मागायला सांगितली. तसेच आदित्यनेही हात जोडून माफी मागितल्याचा  व्हिडिओ शेअर करत दिलगिरी व्यक्त केली.

हे ही वाचा-

चंपकलाल रोल नाकारून मिळाला जेठालाल रोल; वाचा कसे पोहचले जेठालाल घरोघरी

काय सांगता! २६ महिन्यांचा मुलगा विराट कोहली सारखा खेळतोय क्रिकेट, पाहा विडिओ

एकेकाळी खिशात फक्त ५०० रूपये होते आज स्वताला गिफ्ट केले ५ कोटींचे घर, वाचा दिशा पटानीबद्दल..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.