प्रेमाच्या जाळ्यात ओढून फसवणाऱ्या प्रियकराला घडवली अद्दल; सासरच्यांनी हुंडा म्हणून दिले चड्डी बनियन

गया | प्रेमाच्या जाळ्यात अडकवून नंतर लग्नाला नकार दिल्याच्या घटना घडत असतात. प्रियकराविरोधात  तक्रार केल्यावर पोलिस कारवाई करत असतात. मात्र बिहारमधील गया जिल्ह्यातील मानपुर येथे तरूणीला लग्नाला नकार देणे एका तरूणाला चांगलेच महागात पडले आहे.

पिंटू कूमार नावाच्या एका तरूणाच्या भावाचा विवाह बूनियादगंज क्षेत्र येथील एका तरूणीशी झाला होता. पिंटू कूमार हा नेहमी बूनियादगंजमध्ये येत होता. यादरम्यान गावातील ईश्वर मांझीच्या मुलीची पिंटू कुमारशी ओळख झाली.

ओळखीचं रुपांतर प्रेमात होत गेलं. दोघेही एकमेकांच्या खुप जवळ आले. दोघांनी लग्न करायची शपथ घेतली.  ईश्वर मांझी आणि त्याच्या कूटूंबाला दोघांच्या प्रेमसंबंधाबद्दल माहिती मिळाली. मांझी यांच्या मुलीने तरूणाशी लग्न करायचं असल्याचं सांगितलं.

मात्र ऐनवेळी पिंटू कुमारने लग्नाला नकार दिला. लग्नाचा विषय काढल्यास पिंटू कुमार बोलायचं टाळत होता. आपली फसवणूक होत असल्याचं मांझी यांच्या कूटूंबाला समजल्यावर त्यांनी मुफस्सिल ठाण्यात पिंटू कुमार विरोधात तक्रार दाखल केली.

पोलिसांनी पिंटू कुमारच्या परिवाराला आणि मांझी परिवाराला चर्चेसाठी बोलावून घेतले. पोलिसांसमोर पिंटू कुमारने मांझी यांच्या मुलीवर प्रेम असल्याचं सांगितलं. मात्र लग्न करण्यास तयार नसल्याचं सांगितलं. यानंतर मुलीच्या घरचे चांगलेच संतापले.

पोलिसांनी पिंटू कुमारला समजावून सांगितले. यानंतर तो लग्नाला तयार झाला. पोलिस स्टेशन परिसरातील एका मंदीरात पंडीतजीला पोलिसांनी बोलावून घेतले. लॉकडाऊनमुळे बाजारपेठा बंद असल्याने पिंटूला सासरच्यांकडून हूंडा  म्हणून चड्डी बनियन देण्यात आली आणि लग्न लावण्यात आले.

पोलिसांनी यावेळी मिठाई वाटप केली. या नव्या जोडप्याला आशिर्वाद दिले आणि दोन्ही परिवाराकडून शपथ पत्र लिहून घेण्यात आले. नवरदेवाला यामुळे चांगलीच अद्दल घडली आहे. या प्रकाराची चर्चा चांगलीच रंगू लागली आहे.

महत्वाच्या बातम्या-
चक्क शिक्षकच करत होता कोरोना रूग्णांवर उपचार; पोलीसांनी केली अटक
कोरोनाग्रस्त आईला मुलगा व सून रुग्णालयात सोडून गेले; नर्सने आईसारखे सांभाळले आणि..
संतापजनक! लस घ्यायला घराबाहेर पडलेल्या लोकांची पोलिसांकडून लूटमार, अडवून फाडली पावती

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.