लसीचे वितरण कसे होईल? लस कुठे साठवणार? याबद्दल पुनावालांनी दिली महत्वाची माहिती

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये दाखल झाले. सीरम इन्स्टिट्यूटमधे पोहोचल्यानंतर सीरम इन्स्टिट्यूटचे व्यवस्थापकीय संचालक सायरस पुनावाला आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी पंतप्रधानांचे स्वागत केले.

यानंतर सीरमचे प्रमुख आदर पुनावाला यांनी पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधानांच्या या भेटीविषयी माहिती दिली. पुनावाला म्हणाले, ‘जगभरातील एकूण लसींपैकी ५०-६० टक्के लसी भारतात बनवल्या जातात. याशिवाय आता आत्मनिर्भर भारत मोहिमेचा विचार करता आपण साथीरोगाशी लढण्यासाठी पुण्यातील मांजरी येथे सर्वात मोठी व्यवस्था उभी केली आहे. या व्यवस्थेचीही पंतप्रधान मोदी यांना माहिती देण्यात आली.’

‘लोकांपर्यंत लस पोहचवण्याची तयारी आम्ही करतो आहोत. सर्व सामान्य जनतेला परवडेल अशीच लशीची किंमत असणार आहे असंही पुनावाला यांनी म्हटले आहे.  जुलै २०२१ पर्यंत ३० ते ४० कोटी डोस उपलब्ध करणार असेही पुनावाला यांनी येथे बोलताना नमूद केले.

दरम्यान, ‘आतापर्यंत ४ कोटी डोसची निर्मिती झाली आहे. सिरम इन्स्टीट्युटने ऑक्सफर्ड-अस्त्राझेनेकासोबत करार केला आहे. भारतात ‘कोविशिल्ड’ असे ऑक्सफर्डने विकसित केलेल्या या लशीचे नाव आहे. ऑक्सफर्डने तयार केलेली ही लस ७० टक्के परिणामकारक असल्याचे पुनावाला यांनी सांगितले आहे.

याचसोबत पुनावाला यांनी भारतात कोरोना लस साठवण्यासाठीच्या सुविधांबाबत देखील माहिती दिली आहे. ते म्हणाले, ‘भारतात १ किंवा २ डिग्री सेल्सीयस तापमानावर साठवण्याची मोठी क्षमता आहे. मात्र, उणे 20 डिग्री सेल्सीअस तापमानासाठी मात्र आपल्याकडे कमी सुविधा असल्याचे त्यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या
‘महाराष्ट्राच्या इतिहासात इतके धमकावणारे मुख्यमंत्री पाहिले नाहीत’
लढा कोरोनाविरूध्द! ‘या’ शहरात मिळणार मोफत मास्क; घ्या जाणून
मुंबईला पाकव्याप्त कश्मीर, मुंबई पोलीसांना माफीया म्हणने भाजपला मान्य आहे का?

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.