सत्य बोललो तर माझे शीर कापले जाईल; सिरमच्या आदर पुनावालांचा सणसणाटी गौप्यस्फोट

भारताची प्रमुख लस उत्पादक कंपनी आणि जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी सीरम इन्स्टियूट ऑफ इंडिया आता इतर देशांमध्ये लस उत्पादन करण्याचा विचार करत असल्याचे वृत्त समोर आले आहे.

आदर पुनावाला यांनी स्वता ही माहिती दिली आहे. लशीच्या पुरवठ्याबाबत वेळेचं आश्वासन पाळण्यात अडचण येऊ लागल्याने सीरम हे पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. सध्या आदर पुनावाला लंडनला निघून गेले आहेत.

त्यांनी द टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. त्यांनी म्हटलं आहे की मला धमक्या मिळत आहेत. जर मी सत्य बोललो तर माझे शीर कापले जाईल अशी भिती त्यांनी व्यक्त केली आहे.

त्यांनी हा खुलासा केला आहे की आपल्या देशातील श्रीमंत आणि काही मोठ्या राजकीय हस्तींकडून त्यांना या धमक्या येत आहेत. आणि त्यामुळे कोरोना लसीचे उत्पादन लंडनमध्ये करण्याच्या तयारीत ते आहेत.

द टाईम्सने याबाबत वृत्त दिले आहे. ते असेही म्हणाले आहेत की फोन कॉल्स ही अत्यंत वाईट गोष्ट आहे. सतत येणारे फोन त्यांना खुप त्रास देत आहेत. पुढे ते म्हणाले की हे कॉल भारतातील सगळ्यात शक्तीशाली व्यक्तींकडून येत आहेत.

भारतातील बऱ्यात राज्यांच्या मुख्यमंत्र्यांकडून, व्यावसायिक प्रमुखांनी आणि इतरांनी कोविशिल्ड लशीची तात्काळ मागणी केली आहे. धमक्या हा एक अतिरेकीपणा आहे. यातील अपेक्षा आणि आक्रमकतेची पातळी खरोखर खुप मोठी आहे असेही आदर पुनावाला म्हणाले आहेत.

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांनीही याबाबत ट्वीट करताना चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले आहेत की, सिरम इस्टिट्यूटचे आदर पुनावाला लंडनला निघून गेलेत अशी बातमी आहे. द टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी म्हटलं आहे की मला धमक्या मिळत आहेत आणि सत्य बोललो तर शीर कापले जाईल.

NDTV चे पत्रकार रविष कुमार यांनी सुध्दा या संदर्भात पोस्ट केली आहे …देशाला हे कळायला हवं असं त्यांनी ट्वीट केलं आहे. दरम्यान, काही दिवसांपुर्वीच आदर पुनावाला यांना वाय सिक्युरिटी प्रदान करण्याचे आदेश दिले होते.

महत्वाच्या बातम्या
नगरमध्ये महिलेने शेतात सापडलेला बॉम्ब मुलाकडे दिला, अन पुढे जे झालं त्यानं अख्ख नगर हादरल
आदर पुनावालांना राजकीय नेत्यांकडून मुंडकं छाटण्याच्या धमक्या; पुनावालांनी स्वत:च दिली माहीती
एक वर्षापासून वेगळे राहणारे धर्मेंद्र व हेमामालिनी वेगळे होणार? स्वत: हेमानेच केला खुलासा
काय सांगता! ऑक्सिजनसाठी पिंपळाच्या झाडाखाली झोपले रुग्ण, प्रकृतीही झाली स्थिर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.