आनंदाची बातमी! सिरमने कोरोना लसीची किंमत केली कमी; वाचा काय आहे किंमत..

देशभरात कोरोनाच्या संकाटाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आता कोरोनाला रोखण्यासाठी सरकारने वेगवेगळे निर्बंध लावले आहे. कोरोनाला रोखण्यासाठी देशभरात आता लसीकरणालाही सुरुवात झाली आहे.

अशात सिरम इन्सिट्युटचे सीईओ अदर पुनावाला यांनी सर्वांना एक आनंदाची बातमी दिली आहे. सिरम इन्सिट्युटने तयार केलेली लस कोविशिल्ड या कोरोना लसीची किंमत आता कमी करण्यात आली आहे, अदर पुनावाला यांनी याबाबत ट्विट करुन माहिती दिली आहे.

देशातल्या वेगवेगळ्या राज्यातील सरकारला दिली जाणाऱ्या लसींच्या किंमतीत १०० रुपयांनी घट करण्यात आली आहे. सिरमने आधी राज्य सरकारसाठी कोरोना लसची किंमत ४०० रुपये केली होती, आता मात्र ही लस राज्य सरकारला ३०० रुपयांना मिळणार आहे.

सिरम इन्सिट्युटकडून राज्यांना दिली जाणाऱ्या कोरोना लसीची ४०० रुपयांहून कमी करुन ३०० रुपये प्रतिडोस करण्यात आली आहे. या निर्णयामुळे राज्यांचे करोडो रुपयांची बचत होईल. तसेच यामुळे मोठ्या प्रमाणात लसीकरण होईल आणि अनेक लोकांचे जीव वाचवले जाईल, असे ट्विट अदर पुनावाला यांनी केले आहे.

सिरम इन्सिट्युट आणि ऑक्सफर्ड एक्स्ट्राजेनेका मिळून कोविशिल्डची निर्मिती करत आहे. सिरम इन्सिट्युटने या लस रुग्णालयांना ६०० रुपये प्रतिडोसने दिल्या आहे. सध्या भारतात दोन लसी उपलब्ध आहे. एक म्हणजे कोविशिल्ड आणि दुसरी भारत बायोटेकची लस.

भारत बायोटेक हैद्राबादमध्ये स्थित कंपनी आहे. भारत बायोटेकने त्यांनी तयार केलेल्या कोरोना लसींची किंमत राज्य सरकारसाठी ६०० रुपये ठेवली आहे, तर १२०० रुपये ठेवली आहे.

महत्वाच्या बातम्या-

आफ्रिकेतील या पठ्ठ्याने रामदेव बाबालाही दिली टक्कर, शरीराची अशी घडी करतो की..; पाहा व्हिडीओ
अवघड आहे! कोरोना पेशंटचे झाले लग्न; पीपीई किट घालून नवरी लग्नात आली
ठाण्यातील आग लागलेल्या हाॅस्पीटलला भेट द्यायला गेलेल्या भाजपच्या सोमय्यांना हाकलले

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.