अदर पुनावालांनी धुडकावली १ अब्ज डॉलरची ऑफर; जाणून घ्या कोणी दिली होती ही ऑफर

भारतात कोरोना लस तयार करणारी एकच कंपनी आहे. त्यामध्ये एक कंपनी म्हणजे सिरम इन्स्टिट्युट. गेल्यावर्षी सिरम इन्स्टिट्युटने १ अब्ज डॉलरची डिल नाकारली होती, आज आपण त्याच ऑफरबद्दल जाणून घेणार आहोत.

गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात सिरम इन्स्टिट्युटमध्ये जीपी कॅपिटल अबूधाबीची एडिक्यु आणि पब्लिक इनवेस्टमेंट फंडच्या एक कंसोर्टियमच्या एक टिम गुंतवणूक करणार होती. पण पुनावाला यांच्या कुटुंबाने ही ऑफर ऐनवेळी नाकारली होती.

गेल्यावर्षी कंपनीला आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत होता. त्यामुळे पुनावाला यांनी आपले स्टोक विकण्याचा निर्णय घेतला होता. कंपनी आणि इनवेस्टर यांच्यात डिल पण झाली होती. पण व्हॅल्युशल चांगले नसल्यामुळे ऐनवेळी सिरमने ही डील नाकारली होती.

त्यानंतर सिरम कंपनीला मेलिंडा गेट्स फाऊंडेशन तर्फे ३०० मिलियन डॉलरची इनवेस्टमेंट मिळाली होती. सध्या सिरमने एस्ट्राजेनेकासोबतच ५ विदेशी कंपन्यांसोबत हात मिळवणी केली आहे. या कंपन्या सिरम इन्स्टिट्युटला कोरोना लस तयार करण्यामध्ये मदत करत आहे.

तसेच या कोरोनाच्या संकट काळात ३ हजार कोटींची मदत भारत सरकारकडून हवी आहे, असे सिरम इन्स्टिट्युटचे सीईओ अदर पुनावाला यांनी म्हटले आहे. ही मदत मिळाल्यास त्यांना कोरोना लसीची उत्पादन वाढवता येणार आहे.

पुण्यातील सिरम इन्स्टिट्युटला १ अब्ज कोरोना लसी तयार सप्लाय करायच्या आहेत. ज्यामधल्या त्यांना अर्ध्या भारताला द्यायच्या आहे. अशात काही दिवसांपुर्वीच अदर पुनावाला यांनी असा आरोप केला होता, की कोरोना लसीची पुर्तता करण्यासाठी देशातील काही पावरफुल लोकांकडून दबाव टाकला जात आहे.

महत्वाच्या बातम्या-

KOO तुमच्या घरासारखे आहे, बाकी सगळे भाड्याचे; कू ने केले कंगणा राणावतचे स्वागत
या तरुणीने फक्त २९ सेकंदात दोन चोरट्यांना शिकवला धडा; पहा व्हिडिओ
वर्षभरापुर्वी मृत्यु झालेल्या तरुणाचा मृतदेह गावकऱ्यांनी अजूनही ठेवलाय सांभाळून; कारण वाचून बसेल धक्का

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.