सध्या रशिया-युक्रेन वादामुळे शेअर बाजारात प्रचंड अस्थिरता निर्माण झाली आहे. यामुळे गुंतवणूकदारांना मोठ्या तोट्याला सामोरे जावे लागले आहे. सध्या शेअर बाजारात महत्वाच्या कंपनीच्या समभागांमध्ये मोठी घसरण दिसून आली आहे. यामुळे या समभागांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना मोठा तोटा झाला आहे.(Adani’s ‘this’ stock has done well for investors)
पण शेअर बाजारात नेहमीच असे काही शेअर्स असतात, जे त्यांच्या गुंतवणूकदारांना बक्कळ पैसा मिळवून देत असतात. असाच एक शेअर अदानी ग्रुपच्या(Adani Group) कंपनीचा आहे. या शेअरने गुंतवणूकदारांना मोठा परतावा मिळवून दिला आहे. ‘अदानी एंटरप्रायझेस’ असे या शेअरचे नाव आहे. या शेअरने गुंतवणूकदारांना गेल्या काही वर्षांमध्ये तब्बल ३,००,००० टक्के इतका जबरदस्त परतावा दिला आहे.
यामुळे या कंपनीत गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार श्रीमंत झाले आहेत. ‘अदानी एंटरप्रायझेस’ या कंपनीचा शेअर सुरवातीला ५९ पैशांवर होता. आता या शेअरची किंमत २२०० रुपये आहे. पाच वर्षांमध्ये या शेअरने गुंतवणूकदारांना २५०० टक्क्यांपेक्षा जास्त परतावा दिला आहे. २५ एप्रिल २००३ मध्ये BSE वर या शेअरची किंमत ५९ पैसे होती.
१० जून २०२२ रोजी BSE वर या शेअरची किंमत वाढून २२०२.५ रुपये झाली आहे. या पाच वर्षांच्या काळात ‘अदानी एंटरप्रायझेस’ या कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना तब्बल ३,००,००० टक्के परतावा दिला आहे. १६ जून २०१७ रोजी BSE वर या शेअरची किंमत ७५.२७ रुपये होती. आज या शेअरची किंमत BSE वर २२०२.५ रुपये झाली आहे.
जर एखाद्या गुंतवणूकदाराने २५ एप्रिल २००३ रोजी ‘अदानी एंटरप्रायझेस’ या शेअरमध्ये एक लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि ती गुंतवणूक तशीच कायम ठेवली असती, तर आज त्या गुंतवणूकदाराला ३७.२८ कोटी रुपये मिळाले असते. या शेअरने १९ वर्षांमध्ये गुंतवणूकदारांना ३,००,००० टक्के परतावा दिला आहे.
तसेच पाच वर्षांपूर्वी म्हणजेच १६ जून २०१७ रोजी एखाद्या गुंतवणूकदाराने या कंपनीच्या शेअरमध्ये एक लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि ती गुंतवणूक तशीच कायम ठेवली असती, तर आज त्या गुंतवणूकदाराला २९.२५ लाख रुपये मिळाले असते. या शेअरने पाच वर्षांमध्ये गुंतवणूकदारांना २५०० टक्क्यांपेक्षा जास्त परतावा दिला आहे.
महत्वाच्या बातम्या :-
साऊथच्या सुपरस्टारने ‘या’ प्रॉड्युसरला घातल्या होत्या गोळ्या, मग विधानसभेत झाला कायद्याचा रक्षक
VIDEO: हा तर रडीचा डाव; रबाडाने ऋषभ पंतला मारला कोपर, रस्ताही अडवला, कोसळला पंत
लग्नाआधीच राणादा अन् पाठक बाई गेले हनिमूनला? ‘तो’ रोमँटिक फोटो होतोय व्हायरल