गेल्या महिन्यात अमेरिकेच्या हिंडनबर्गने अदानी ग्रुपवर गंभीर आरोप केले होते. त्यांनी अदानी ग्रुपने शेअर्सच्या किंमती मॅन्युपलेट केल्याचे म्हटले होते. त्यामुळे गौतम अदानींना याचा मोठा फटका बसला होता. त्यांना कोट्यवधी रुपयांची संपत्ती गमवावी लागली आहे.
हिंडनबर्गने अहवाल सादर केल्यापासून अदानी ग्रुपच्या शेअर्सच्या किंमती मोठ्या प्रमाणात खाली येत आहे. पण हिंडनबर्गने अजूनही अदानींना लक्ष्य करणं सोडलेलं नाही. त्यामुळे आता अदानी ग्रुपने एक मोठा निर्णय घेत हिंडनबर्गशी दोन-दोन हात करण्याचा निर्णय घेतला आहे.
अदानी ग्रुप हिंडनबर्ग विरोधात कायदेशीर लढा देण्याचा विचार करत होता. त्यानुसार आता त्यांनी एक मोठं पाऊल उचललं आहे. अदानी ग्रुपने वॉचटेल नामक कायदेशीर लढा देणाऱ्या अमेरिकन कंपनीशी याबाबत चर्चा केली आहे. हिंडनबर्ग ही अमेरिकन कंपनी असल्यामुळे अमेरिकन लॉ फर्मद्वारे त्यांच्या कारवायांवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न अदानी ग्रुप करत आहे.
फायनान्शियल टाईम्सनुसार, हिंडनबर्गशी कशाप्रकारे डील करायचं यासाठी अदानी ग्रुप वॉचटेलच्या लिप्टन, रोझन आणि कार्ट्झ या वरिष्ठ वकिलांशी सल्ला घेणार आहे. वॉचटेल ही न्युयॉर्कमधील कंपनी आहे. ही कंपनी कॉर्पोरेट लॉ संबंधींच्या मोठ्या केसेसवर काम करते.
हिंडनबर्गच्या अहवालामुळे अदानी ग्रुपला मोठे नुकसान सोसावे लागले आहे. त्यांच्या कंपन्यांचे शेअर्स दिवसेंदिवस खाली येत चालले आहे. हिंडनबर्गने अदानी ग्रुपला अनएथिकल शॉर्ट सेलर असे म्हटले होते. तसेच त्यांनी अदानी ग्रुपवर अनेक गंभीर आरोप करत काही प्रश्न सुद्धा उपस्थित केले होते.
हिंडनबर्गच्या अहवालानंतर अदानी ग्रुपने एक पत्र सुद्धा पाठवले होते. पण तरीही शेअर्सच्या किंमती कोसळताना दिसल्या. अदानी ग्रुपचे नुकसान झाल्यामुळे गौतमी अदानींच्या संपत्तीतही मोठी घट झाली. त्यामुळे ते सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या यादीत २० व्या स्थानावरुनही खाली घसरले आहे.
महत्वाच्या बातम्या-
राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार? पवारांच्या सर्वात विश्वासू नेत्याने दिली फडणवीसांसोबत गुप्त चर्चेची कबुली, म्हणाला..
काँग्रेस आणि राष्ट्रवादीत पुन्हा पडणार फुट? नव्या गटनेत्याच्या नावामुळे चर्चांना उधाण
मस्क, अंबानींनी मागे टाकत फोर्ब्सच्या ‘या’ यादीत अदानी ठरले टॉपर; फेरारीच्या वेगाने वाढली संपत्ती