भारतात भितीदायक कोरोना, तरीही आयपीएल सुरू, तुम्हाला काही वाटत नाही का? गिलख्रीस्टने सुनावले

एकीकडे देशभरात कोरोनाच्या संकटाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली आहे. अनेक रुग्णांचा मृत्युही होत आहे. तर दुसरीकडे देशात आयपीएल सुरु आहे. त्यामुळे अशा संकटाच्या परिस्थितीतही आयपीएल होत असल्याने अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहे.

आता भारताच्या आयपीएल सुरु असलेल्या चर्चेवरुन ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू ॲडम गिलख्रिस्टने ट्विट करत काही प्रश्न उपस्थित केले आहे. भीतीदायक कोरोना असतानाही भारतात आयपीएल सुरु आहे, असे गिलख्रिस्टने ट्विट करत म्हटले आहे.

भारताला माझ्या शुभेच्छा. कोरोनाची भितीदायक संख्या असताही आयपीएल सुरु आहे. हे योग्य आहे का? प्रत्येक रात्री तुम्ही हे पाहून विचलित होतात का? याबाबत आपले विचार काय आहे. माझ्या प्रार्थना आपल्या बरोबर आहे, असे ट्विट गिलख्रिस्टने केले आहे. त्यामुळे आता सगळीकडे त्याच्याच ट्विटची चर्चा सुरु आहे.

दरम्यान, देशात झपाट्याने रुग्णसंख्यामध्ये वाढ होत आहे. शनिवारी कोरोनाचे ३ लाख ४६ हजार ७८६ कोरोना रुग्ण सापडले आहे. एका दिवसातील ही सर्वाधिक रुग्ण संख्या आहे. तर २६२४ कोरोना रुग्णांचा मृत्यु झाला आहे.

राज्यातही कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. काल ६७ हजार १६० कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. तर ६७६ कोरोना रुग्णांच्या मृत्युची नोंद झाली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने राज्यात कडक निर्बंध लावले आहे. तसेच १ मे पासून १८ वर्षांवरील सर्व नागरीकांना कोरोना लस देण्यात येणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

भारत संकटात आहे, मदतीसाठी दान करा; शोएब अख्तरचे चाहत्यांना व पाकीस्तान सरकारला आवाहन
भारीच! आता कोरोना काळात हे पाच पेय प्या आणि झटपट आपली रोग प्रतिकारकशक्ती वाढवा
डॉक्टरांचा सल्ला! प्रिस्क्रिप्शनवर लिहितात, एक झाड लावा ऑक्सिजन कमी पडणार नाही

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.