बापरे! ‘त्या’ दिवशी नर्गिस दत्त रेखाला म्हणाल्या होत्या चुडैल; कारण ऐकूण धक्का बसेल

बॉलीवूडच्या एव्हरग्रीन ब्यूटी रेखाचे आयूष्य खुप मोठे रहस्य आहे. त्यांच्या वैयक्तिक आयूष्याबद्दल खुप कमी लोकांना माहीती आहे. रेखाबद्दल असे अनेक रहस्य आणि आरोप आहेत. ज्यामूळे त्यांना इंडस्ट्रीमध्ये वाईट गोष्टी ऐकाव्या लागतात.

पण तरीही रेखा यांनी आजपर्यंत त्यांच्यावर लागलेल्या आरोपांवर काहीही स्पष्टीकरण दिले नाही. त्या नेहमी शांत राहील्या. त्यांनी कोणालाही स्पष्टीकरण देणे गरजेचे समजले नाही. त्या त्यांच्यावर लागलेल्या आरोपांना घेऊन नेहमीच शांत असतात.

आज आपण रेखावर लागलेल्या अशाच एका आरोपाबद्दल जाणून घेणार आहोत. रेखावर हा आरोप अभिनेत्री नर्गिस यांनी लावला होता. त्यावेळी रेखाचे वय फक्त २२ वर्ष होते. एवढ्या कमी वयात देखील त्यांना अडचणींचा सामना करावा लागला होता. रेखा आणि नर्गिसचे हे भांडण बॉलीवूडच्या सर्वात प्रसिद्ध भांडणापैकी एक आहे.

रेखाचे त्यांच्या अभिनयासाठी आणि सुंदरतेसाठी खुप कौतूक करण्यात आले. पण दुसरीकडे त्यांच्या वैयक्तिक आयूष्याला त्यांना अनेक वाईट गोष्टी देखील ऐकाव्या लागल्या. कारण रेखाचे नाव इंडस्ट्रीतील मोठ्य मोठ्या विवाहीत कलाकारांशी जोडले जायचे.

अमिताभ बच्चनसोबत त्यांच्या प्रेम कहाणीचे चर्चे आजही होत असतात. त्यासोबतच जितेंद्र, धर्मेंद्र, राज बब्बर एवढेच नाही तर सुनिल दत्तसोबत देखील त्यांचे नाव जोडले गेले होते. त्यामूळे रेखाची प्रतिमा खुप खराब झाली होती. विवाहीत अभिनेत्यांसोबत अफेअर करणारी अभिनेत्री म्हणून त्यांना ओळखले जाऊ लागले होते.

याच कालावधीमध्ये रेखा आणि सुनील दत्तच्या अफेअरची चर्चा सुरु झाली होती. त्यामूळे रेखाला नर्गिसच्या रागाचा सामना करावा लागला होता. रेखा आणि सुनिल दत्तचे प्राण जाये पर वचन ना जाये, नागिन यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले होते.

चित्रपटाच्या सेटवर दोघांच्या अफेअरच्या चर्चा होत होत्या. ही गोष्ट नर्गिसकडे पोहोचली. त्यावेळी त्या खुप चिडल्या. रागात त्यांनी रेखाला अतिशय वाईट शब्द बोलले होत्या. दुसरी कोणी अभिनेत्री असती तर त्यांनी हे कधीच ऐकूण घेतले नसते. पण रेखाने मात्र यावर काहीह प्रतिक्रिया दिली नाही.

नर्गिस रेखाला म्हणाला होत्या की, ‘आत्ता मी रेखाला चांगलेच ओळखले आहे. ती कोणालाही आपल्या सुंदरतेच्या जाळ्यात अडकवू शकते. म्हणून काही लोकांसासाठी ती चुडैल आहे. माझ्यासाठी ती मानसिक रुग्ण आहे. ज्याला प्रत्येक गोष्ट हवी असते. त्यामूळे तिला तिच्या आयूष्यात एका मजबूत पुरुषाची गरज आहे’.

ज्यावेळी नर्गिस यांनी रेखावर हे आरोप केले होते. त्यावेळी रेखाचे वय २२ वर्ष होते. पण रेखाने यावर काहीही प्रतिक्रिया दिली नाही. त्या शांत बसल्या. रेखाने सुनिल दत्तसोबत काम करणे बंद केले. रेखा आणि नर्गिसने देखील कधीच एकत्र काम केले नाही.

पुढे जाऊन सुनिल दत्त आणि नर्गिसचा मुलगा संजयसोबत रेखाचे नाव जोडले गेले. दोघांनी एका चित्रपटामध्ये एकत्र काम केले. सेटवर त्यांच्या अफेअरच्या बातम्या सुरु झाल्या.पण त्यावेळी देखील रेखाने प्रतिक्रिया न देता शांत राहणे योग्य समजले.

महत्वाच्या बातम्या –

मेकअपशिवाय ‘अशी’ दिसते तब्बू; फोटो पाहून चाहत्यांना बसला धक्का

पुजा हेगडेने मुंबईमध्ये खरेदी केला स्वतः चा आशियाना; पहा घराचे फोटो

शिवजयंतीचे औचित्य साधून अजंली बाईंचा नवीन फोटोशूट; पहा व्हिडिओ

डिंपल कपाडिया नाही तर ‘ही’ अभिनेत्री आहे काकांचे पहीले प्रेम; शेवटच्या दिवसांमध्ये देखील राहत होते एकत्र

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.