चुकीच्या वेळी लग्न करणे ‘या’ अभिनेत्रींना पडले महागात

असे बोलले जाते आयुष्यात प्रत्येक गोष्ट वेळेवर व्हायला हवी. खास करुन लग्न. लोक बोलतात की, मुलींनी वेळेवरच लग्न केले पाहिजे. पण तुम्हाला माहिती आहे का कधी कधी तुमचा लग्न करण्याचा निर्णय तुमचे आयुष्य बदलून टाकतो.

असेचं काही झाले आहे बॉलीवूड अभिनेत्रींच्या करिअरबद्दल. कारण बॉलीवूडच्या काही अभिनेत्रींनी करिअरच्या टॉपवर असताना लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि हिच त्यांची सर्वात मोठी चुक झाली. लग्नानंतर त्यांचे करिअर पुर्णपणे खराब झाले.

जाणून घेऊया बॉलीवूडच्या काही अशा अभिनेत्रींबद्दल ज्यांनी करिअरच्या टॉपवर असताना लग्न केले. त्यांच्या लग्नाच्या निर्णयामूळे त्यांचे करिअर खराब झाले.

१) माधुरी दीक्षित – बॉलीवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित ९० च्या दशकात टॉपची अभिनेत्री होती. तिच्या पुढे कोणतीही अभिनेत्री टिकू शकत नव्हती. तिने हम आपके है कौन, दिल तो पागल है आणि देवदास यांसारखे सुपरहिट चित्रपट केले.

एवढ्या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर माधुरी दीक्षित यशाच्या शिखरावर पोहोचली होती. पण या शिखरावर असताना माधुरी दीक्षितने लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि ती बॉलीवूडमधुन गायब झाली.

तिने अमेरिकेन डॉक्टर श्रीराम नेनेसोबत लग्न केले आणि ती अमेरिकेला शिफ्ट झाली. यामुळे ती बॉलीवूडपासून लांब गेली आणि तिचे करिअर संपले. लग्नानंतर अनेक वर्षे ती अमेरिकेतच होती. पण काही दिवसांनी ती बॉलीवूडमध्ये परत आली. परत आल्यानंतर तिला बॉलीवूडमध्ये हवे तसे यश मिळाले नाही

२) ऐश्वर्या राय – मिस वर्ल्ड आणि मिस इंडियामध्ये उत्तम प्रदर्शन केल्यानंतर ऐश्वर्या रायने बॉलीवूडमध्ये येण्याचा निर्णय घेतला. तिला यात यश देखील मिळाले. खुप कमी वेळात ती यशस्वी झाली.

तिने एकापेक्षा एक चित्रपटांमध्ये तिचे अभिनय कौशल्य दाखवले आणि बॉलीवूडची टॉपची अभिनेत्री झाली. पण त्यांनतर २००७ मध्ये तिने अभिषेक बच्चनसोबत लग्न केले आणि तिचे करिअर संपले. तिने कमबॅक केला. पण तिला यश मिळाले नाही.

३)काजोल – काजोलने खुप कमी वेळात बॉलीवूडमध्ये यश मिळवले. तिने तिच्या दमदार अभिनयाने अनेक भुमिका गाजवल्या. तिने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले.

पण १९९८ मध्ये ती तिच्या करिअरच्या टॉपवर होती. पण या वेळेस तिने लग्न करण्याचा निर्णय घेतला. तिने अभिनेता अजय देवगनसोबत लग्न केले आणि संसारात व्यस्त झाली. लग्नानंतर तिने चित्रपटांमध्ये काम केले पण तिला काही खास यश मिळाले नाही.

४)राणी मुखर्जी – एक काळ असा होता ज्यावेळी राणी मुखर्जी बॉलीवूडवर राज्य करत होती. तिचे सर्व चित्रपट सुपरहिट होत होते. ती यशाच्या शिखरावर होती.

याच कालावधीमध्ये राणीने निर्माता आणि दिग्दर्शक आदित्य चोप्रासोबत लग्न केले. लग्नानंतर तिने अभिनयात ब्रेक घेतला. पण थोड्या दिवसांनी तिने कमबॅक केला. पण यश मिळाले नाही.

महत्वाच्या बातम्या –

खळबळजनक! त्या पार्टीमध्ये दिशावर झाला सामूहिक बलात्कार; प्रत्यक्षदर्शीचा खुलासा

प्रेमाच्या चक्करमध्ये बॉलीवूडच्या ‘या’ अभिनेत्रीला खावी लागली होती जेलची हवा

अक्षय कुमारच्या प्रेमात वेडी झाली होती रेखा; अशा प्रकारे करायची जवळ जाण्याचा प्रयत्न

..म्हणून सनी देओल आणि बॉबी देओलचे करिअर फ्लॉप झाले

..म्हणून सैराटफेम अभिनेता आज अभिनय सोडून करत आहे शेती

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.